नाटय़क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांना यंदाचा कै. चिं. त्र्यं. खानोलकर ऊर्फ आरती प्रभू पुरस्कार जाहीर झाला आहे. कुडाळ येथील बाबा वर्दम थिएटर्स आणि कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाची आरती प्रभू कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या वर्षांपासून हा पुरस्कार देण्यात येतो. अमेरिकेतील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनिल नेरुरकर यांनी पुरस्कृत केलेला हा पुरस्कार रोख ११ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ या स्वरूपातील आहे. येत्या २६ एप्रिल रोजी सायं. ६ वा. कै. बाबा वर्दम स्मृती रंगमंच, सांस्कृतिक भवन, कुडाळ येथे होणाऱ्या पुरस्कार समारंभात सतीश आळेकर यांना हा पुरस्कार साहित्य संमेलनाध्यक्ष फ. मुं. शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th Mar 2014 रोजी प्रकाशित
सतीश आळेकर यांना आरती प्रभू पुरस्कार
नाटय़क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांना यंदाचा कै. चिं. त्र्यं. खानोलकर ऊर्फ आरती प्रभू पुरस्कार जाहीर झाला आहे.

First published on: 27-03-2014 at 07:19 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satish alekar got aarti prabhu award