महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेल्या ‘शेकरू’विषयी सर्वसामान्यांमध्ये जनजागृती आणि त्याच्या जतन व संवर्धनासाठी शेकरूविषयक सविस्तर माहिती असलेले पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. राज्य शासनाच्या कोल्हापूर वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक एम. के. राव आणि प्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक डॉ. रेने बोर्जीस यांनी त्याचे लेखन केले आहे.
शेकरू हा प्राणी ‘खार’ प्राणिगटात येतो. मात्र विविध प्रदेशांनुसार त्याच्या रंगात फरक पडतो. शेकरूची राहण्याची ठिकाणे, त्याची आवडती झाडे, त्याची शरीररचना, त्याचे खाद्य, त्याच्या रंगावर होणारे परिणाम, महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात शेकरूचे आढळणारे विविध प्रकार आदी बरीच माहिती पुस्तकातआहे. पुस्तकाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे शेकरू या प्राण्याची ‘लाइन ट्रान्सेक्ट’ पद्धतीने मोजणी करताना मिळालेले नकाशे यात देण्यात आले आहेत.  शेकरू लाजाळू प्राणी म्हणून ओळखला जातो. भीमाशंकर तसेच पश्चिम घाट परिसरातही शेकरू मोठय़ा संख्येने आढळून येतात. भीमाशंकर येथे दरवर्षी शेकरूंची गणना केली जाते. इतर प्राण्यांसारखे शेकरू एकाच घरटय़ात न राहता ते वेगवेगळ्या झाडांवर घरटे बांधून राहतात.अधिक माहितीसाठी संपर्क एम.के. राव (०२३१-२६५३६३२).

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shekru in text book