‘वळू’, ‘विहीर’ आणि राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या ‘देऊळ’ चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक उमेश कुलकर्णी, तसेच ‘मसाला’, ‘पुणे ५२’ या चित्रपटाचे निर्माते-अभिनेते गिरीश कुलकर्णी यांच्या ‘अरभाट निर्मिती’तर्फे एप्रिल महिन्यापासून ‘शॉर्ट फिल्म क्लब’ची स्थापना करण्यात येत आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या प्रेक्षागृहामध्ये १८ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता या क्लबचे उद्घाटन होणार आहे.  या क्लबचे सभासद होण्यासाठी ०२०-२५४३३५४९ किंवा ९८६०४३६९२५ या क्रमांकावर संपर्क साधावा.