सम्राट चौकातील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयातील सहा विद्यार्थिनींची सोलापूर जिल्हा पोलीस दलात निवड झाली आहे.
या महिला महाविद्यालयात उल्काताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भरतीपूर्व महिला पोलीस प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहे. यात शारीरिक शिक्षण संचालक प्रा. दत्तात्रेय गायकवाड यांच्या अधिपत्याखाली यापूर्वी बारा विद्यार्थिनींची पोलीस दलात निवड झाली होती. यंदा स्वाती अंबुरे, अश्विनी काटकर, ताई कोकाटे,  रेश्मा जगताप, प्रियांका शिंदे व मधुमती शिंदे या सहा विद्यार्थिनींची पोलीस दलात निवड झाली आहे. या यशस्विनी विद्यार्थिनींचा सत्कार प्राचार्य डॉ. राजीव बावधनकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रशिक्षक प्रा. दत्तात्रेय गायकवाड, उपप्राचार्य राजेंद्रसिंह लोखंडे, प्रा. मल्लिनाथ अंजुनगीकर, डॉ. रावसाहेब ढवण, प्रा. सुरेश ढेरे यांच्यासह दादाराव कोकाटे, धर्मराज शिंदे, दत्तात्रेय अंबुरे व कार्यालयीन प्रमुख महिपती निकम हे उपस्थित होते.