लैंगिक विकृती आणि अत्याचार यावर प्रभावीपणे भाष्य करणारे ‘अॅग्रेसिव्ह’ हे नाटक ८ पेब्रुवारी २०१४ रोजी रंगभूमीवर सादर होत आहे. मल्हार निर्मित आणि साई एन्टरटेंट प्रस्तुत या नाटकाची निर्मिती जे. विष्णू यांनी केली आहे. नाटकाचे लेखन निनाद शेटय़े यांचे असून दिग्दर्शन सुनील नाईक यांचे आहे. स्त्री-पुरुष लैंगिक संबध ही खासगी बाब असली तरी माहितीच्या महाजालाच्या क्रांतीमुळे यातून लैंगिक विकृती निर्माण होत आहेत. यामुळे त्या संबंधित व्यक्तीबरोबच त्याच्या कुटुंबाही मनस्तापाला सामोरे जावे लागते. याचे चित्रण नाटकात मांडण्यात आले आहे. या नाटकात दोन गाणी असून ती अमोल कांबळे यांनी संगीतबद्ध केली आहेत. नाटकाचे नृत्य दिग्दर्शन राहुल काळे यांचे आहे. या नाटकात गौरी पाटील, संध्या कुठे, वैभव सातपुते, मौसमी तोंडवळकर हे कलाकार आहेत. पाश्र्वसंगीत आशिष केळकर यांचे आहे.
संग्रहित लेख, दिनांक 29th Jan 2014 रोजी प्रकाशित
लैंगिक अत्याचारावर भाष्य करणारे ‘अॅग्रेसिव्ह’!
लैंगिक विकृती आणि अत्याचार यावर प्रभावीपणे भाष्य करणारे ‘अॅग्रेसिव्ह’ हे नाटक ८ पेब्रुवारी २०१४ रोजी रंगभूमीवर सादर होत आहे. मल्हार निर्मित आणि साई
First published on: 29-01-2014 at 07:29 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Talking on sexual harassment people becomes aggressive