मराठवाडा दुष्काळाच्या आगीत होरपळत असताना सरकार मात्र उपाययोजना करण्यात अपयशी ठरत आहे. या विरोधात आवाज उठवण्यासाठी उद्या (रविवारी) रिपब्लिकन पक्षातर्फे(आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांच्या जाहीर सभेचे आयोजन केले आहे. युवा रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी ही माहिती दिली. सरकारच्या दलितविरोधी धोरणास विरोध करून लोकसभा व विधानसभेमध्ये सत्ता परिवर्तन घडविण्यासाठी आठवले यांच्या उपस्थितीत होणाऱ्या सभेस मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कागदे यांनी केले आहे.