महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा १८ मे रोजी होऊ घातली असल्याने त्या दिवशीच्या विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षा पुढे ढकलण्यात येणार आहेत. दोन्हीही परीक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना त्यामुळे अडचण जाणार होती. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी विद्यापीठाने त्या दिवशीचा पेपर पुढे ढकलावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. त्यानुसार आज प्र-कुलगुरू डॉ. महेश येंकी यांनी त्या दिवशीच्या परीक्षा पुढे ढकलण्याला हिरवी झेंडी दाखवली आहे. विद्यापीठाची परीक्षा शनिवारी, १८ मे रोजी सकाळी ९.३० ते १२.३० आणि दुपारी २ ते ५ या वेळेत तर दुपारी ४ ते ६ राज्य सेवा पूर्व परीक्षा होणार होती.
एमएच्या दुसऱ्या सत्राच्या इंग्रजी(दी इंग्लिश नॉवेल-१), मराठी(अर्वाचीन मराठी गद्य मराठी वैचारिक निबंध-२), हिंदी(आधुनिक हिंदी साहित्याचा इतिहास), उर्दू(क्लासिकल पोएट्री), अर्थशास्त्र(सूक्ष्म अर्थशास्त्र विश्लेषण-२), इतिहास(इतिहासाचा कल आणि सिद्धांत), राज्यशास्त्र(भारतीय प्रशासन), लोकप्रशासन(लोकप्रशासनाचा सिद्धांत), भूगोल(रिसर्च मेथडॉलॉजी), समाजशास्त्र(क्लासिकल थेअरॉटिकल फाउंडेशन), महिलांचा अभ्यास(भारतातील महिलांचे अधिकार), डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा(सामाजिक विचार), गांधी विचारधारा(बेसिक वर्क्स ऑफ महात्मा गांधी-२), गृह विज्ञान(सिसोर्स मॅनेजमेंट), बुद्धिस्ट स्टडीज(भारतातील बौद्ध विचार इतिहास), तत्त्वज्ञान(वेस्टर्न इथिक्स), मानसशास्त्र(अद्ययावत सामान्य मानसशास्त्र), प्रवास आणि पर्यटन(रिलिजिअस आणि कल्चरल बॅकग्राऊंड ऑफ इंडिया) इत्यादी विषयांच्या पेपर्सबरोबरच अरेबिक, पर्शियन, संस्कृत, पाली, लिंग्विस्टिक याविषयांचा ‘क्लासिकल प्रोझ’ या विषयाची परीक्षाही १८ मे रोजी होणार होती. याशिवाय गणित-३, बीए प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष आणि तिसऱ्या वर्षांतील परीक्षांसह मास्टरऑफ फाईन आर्ट प्रथम आणि द्वितीय वर्षांच्या परीक्षाही याच दिवशी होणार होत्या. मात्र, त्या दिवशी एमपीएससीची परीक्षा असेल तर विद्यापीठाच्या परीक्षा निश्चितच पुढे ढकलल्या जातील. त्यासंबंधी परीक्षा विभागाचे एक पत्रही प्र-कुलगुरू कार्यालयाला प्राप्त झाले असून तसा निर्णय घेण्यात आल्याचे डॉ. महेश येंकी म्हणाले. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना या दोन्ही परीक्षा स्वतंत्रपणे देणे शक्य होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 2nd May 2013 रोजी प्रकाशित
विद्यापीठाच्या १८ मे रोजीच्या परीक्षा पुढे ढकलणार -येंकी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा १८ मे रोजी होऊ घातली असल्याने त्या दिवशीच्या विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षा पुढे ढकलण्यात येणार आहेत. दोन्हीही परीक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना त्यामुळे अडचण जाणार होती.
First published on: 02-05-2013 at 03:52 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: University will postpone examination of 18th may yenki