गणेशाच्या भव्य मूर्ती साकारण्यात विदर्भातील ज्येष्ठ मूर्तीकार शंकरराव वझे यांचा गुरूपौणिमेनिमित्य संस्कार भारतीतर्फे  सोमवारी सत्कार झाला.
वध्र्यालगत सिंदी (मेघे) येथे त्रिवेणी आर्टसच्या माध्यमातून कार्यरत मूर्तीकार वझे गणेश व देवीभक्तांमध्ये विशेष परिचित आहे. गेल्या ५० वर्षांंपासून या क्षेत्रात वझे यांनी वयाच्या बाराव्या वर्षी मूर्तीकलेचा ओनामा मामा गिरधर कपाट यांच्याकडे गिरविला. या कलेत अधिक पारंगत होण्यासाठी ते नागपूरला गेले. कॉटन मार्केट व लालबाग येथे त्यांना तनसाच्या मोठय़ा मूर्ती तयार करण्याचे व त्यात भाव ओतण्याचे प्रशिक्षण ख्यातनाम मूर्तीकार सुखदेवजी ठाकरे यांनी दिले. या कलेत पारंगत झाल्यानंतर ते वध्र्यात परतले. त्यांनी वध्र्यात तनसापासून भव्य मूर्ती तयार करण्यास सुरुवात केली. वध्र्यातील गणेशोत्सोव व नवरात्रात त्यांच्या मूर्ती विराजमान होऊ लागल्या. आज वयाच्या ६५ व्या वर्षीही ते हे काम मन ओतून करतात. त्यांची मुले राजेंद्र, भास्कर व पद्माकर यांनीही वडिलांचा वारसा पुढे चालू ठेवला आहे.  पत्नी कौसल्याबाई, तसेच नातवंडांसह ते विविध मूर्ती घडविण्याचे व त्या माध्यमातून मूर्तीकलेचा वारसा समृध्द  करत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. शंकररावांनी या कलेत अधिक शिष्य तयार कराव, अशी भावना संस्कार भारतीचे अध्यक्ष सतीश बावसे, तसेच मंगेश परसोडकर यांनी सत्कारप्रसंगी व्यक्त केली.
परिवहन समितीच नाही -तुषार भारतीय
शहरातील परिवहन सेवा संचालित करण्यासाठी परिवहन समिती गठित करणे आवश्यक आहे. सध्या कंत्राटदार कंपनीचा मनमानी कारभार सुरू आहे. बसवाहकांची अरेरावी प्रवाशांना सहन करावी लागते. या बससेवेचा परीघ वाढवण्याची गरज आहे, असे मत भाजपचे नगरसेवक तुषार भारतीय यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले. शहराच्या सभोवताली असलेल्या गावांपर्यंत ही सेवा पोहोचायला हवी आणि बसगाडय़ांची दुरुस्ती होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.