विकास सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय धोरण, प्रशासकीय कामकाजात सहकार तत्त्वाचा केलेला अवलंब सहकार चळवळीस आदर्शवत ठरला आहे. कारखान्याची दहा वर्षांच्या काळातील वाटचालीची दखल घेऊन राज्य सरकारच्या वतीने सहकारनिष्ठ पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या हस्ते कारखान्यास सहकार पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, वनमंत्री पतंगराव कदम, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री लक्ष्मण ढोबळे, आदिवासी विकासमंत्री बबनराव पाचपुते, सहकार राज्यमंत्री प्रकाश सोळुंके, तसेच कारखान्याचे अध्यक्ष आमदार अमित देशमुख, आमदार वैजनाथ शिंदे, उपाध्यक्ष विजय देशमुख, कार्यकोरी संचालक एस. डी. बोखारे आदी या वेळी उपस्थित होते.कारखान्याने कामकाजात सहकार तत्त्वाचा केलेला अवलंबही महत्त्वाचा ठरला. कारखान्याच्या आर्थिक बाजूही पुरस्कार निवडीसाठी सरस ठरल्या. सभासदांसाठी ऊसविकास योजना, ऊसशेती यांत्रिकीकरण, सामाजिक योजना, कार्यक्षेत्रातील रोजगार निर्मिती, मनुष्यबळ विकास उपक्रम आदी बाबींची दखल घेण्यात येऊन कारखान्यास पारितोषिक देण्यात आले.