मी दादर येथील वैशाली ज्वेलर्समध्ये भागीदार आहे. तुम्हाला शुद्ध सोने कमी भावात देते असे सांगून गिरगावमधील माधवी किशोर टेंबे (२८) या तरुणीने दोघा डोंबिवलीकरांना ९ लाख ९० हजार रुपयांना फसविले आहे. माधवी गिरगावमधील क्रांतीनगरमध्ये राहते. तिने गोग्रासवाडीत राहणाऱ्या जीवन माळी (वय ४०) यांच्याकडून ३ लाख ८० हजार रुपये शुद्ध सोने देण्याची बतावणी करून उकळले. राजाजी पथावरील ज्ञानेश्वर कोळमकर (वय ४८) यांच्याकडूनही माधवीने शुद्ध सोन्याची नाणी देते सांगून ६ लाख रुपये वसूल केले आहेत. या दोघांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी रामनगर, टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 29-06-2013 at 12:01 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young girl of girgaum cheated two man of dombivali