ट्रकने दिलेल्या धडकेमध्ये एक युवक जागीच ठार झाला. तर एक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात सोमवारी दुपारी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील शिरोली येथील मयूर पेट्रोल पंपाजवळ झाला. चित्तरंजन सुदर्शन जेना (वय २६) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर त्याचा मित्र मानसकुमार दास (वय २८) हा गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जेना व दास हे मूळचे ओरिसा राज्यातील आहेत. सध्या ते तळसंदे येथे राहतात. जेना हा कंत्राटदार आहे. कामानिमित्त जेना व दास हे दुचाकीवरून कागल येथे गेले होते. तेथील काम संपवून ते परत राष्ट्रीय महामार्गावरून घरी चालले होते. मयूर पेट्रोल पंप येथून जात असताना पाठीमागून आलेल्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामध्ये जेना चिरडला जाऊन जागीच ठार झाला. तर दास हा गंभीर जखमी झाला.घटनास्थळी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश भंडारे दाखल झाले होते. अपघाताची नोंद पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 7th Jan 2013 रोजी प्रकाशित
ट्रकच्या धडकेत युवक ठार
ट्रकने दिलेल्या धडकेमध्ये एक युवक जागीच ठार झाला. तर एक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात सोमवारी दुपारी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील शिरोली येथील मयूर पेट्रोल पंपाजवळ झाला. चित्तरंजन सुदर्शन जेना (वय २६) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
First published on: 07-01-2013 at 07:56 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth died in truck accident