देशभरात महिलांवर होणारे अत्याचार आणि गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे पण अत्याचाराविरोधात लढणाऱ्या काही मोजक्या स्त्रिया समोर येऊन तक्रार दाखल करतात. पण अशा कित्येक महिला आहे ज्या गुन्ह्याविरोधात आवाज उठवत नाही आणि अन्याय सहन करतात. महिलांनी जर स्वत: समोर येऊन तक्रार नोंदवली तर गुन्हेगारांना शिक्षा होईल आणि महिलांना न्याय मिळेल. आता हे चित्र बदलत आहे. आता महिला त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराविरोधात आवाज उठवत आहे. कित्येक महिला स्वत:हून पोलिसांकडे तक्रार नोंदवत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“एनसीआरबीच्या माहितीनुसार, महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये एफआयआरच्या संख्येत झालेली वाढ हे दिसते आणि कित्येक महिला पुढे येत आहेत आणि अशा प्रकरणांची तक्रार करत आहेत, ही एक सकारात्मक घटना आहे.” असे राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा यांनी गुरुवारी सांगितले.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने नुकत्याच जाहीर केलेल्या सर्वेक्षणाबाबत बोलताना शर्मा यांनी सांगितले की, “एनसीआरबीच्या माहितीनुसार अधिक महिला पुढे येत आहेत आणि त्यांच्याविरुद्ध घडणारे गुन्ह्यांसाठी तक्रार नोंदवत आहेत. दिल्ली, यूपीमध्ये अधिक एफआयआर नोंदवल्या जात आहेत. ही माहिती वाढत्या गुन्ह्यांची संख्या दर्शवत नाही तर अनेक महिला पुढे येऊन तक्रार करत आहेत हे स्पष्ट करते.

हेही वाचा – डॉ. अक्षता कृष्णमुर्ती ठरली मंगळ ग्रहावर रोव्हर चालवणारी पहिली भारतीय नागरिक; जाणून घ्या तिचा प्रेदणादायी प्रवास

“ही माहिती किती एफआयआर नोंदवले गेले आणि किती FIRदाखल झाली हे सांगत नाही. ही माहिती फक्त एफआयआरच्या आधारे समोर आली आहे आम्ही नेहमी पोलिसांना सांगतो,”जेव्हा एखादी महिला तक्रार करते तेव्हा नेहमी एफआयआर नोंदवा.” हा एक सकारात्मक बदल आहे. जोपर्यंत आपण याबाबत बोलणार नाही तोपर्यंत ही स्थिती बदलणार नाही. मला महिलांना सांगायचे आहे की, समोर या आणि तक्रार दाखल करा. जर पोलिसांना ऐकले नाही तर NCW कडे तक्रार करा.” असेही शर्मा यांनी यावेळी स्पष्ट केले.

महिलांवरील कौटुंबिक हिंसाचारावर बोलताना शर्मा यांनी सामाजिक मानसिकता बदलण्याच्या गरजचे आहे यावर भर दिला.”कौटुंबिक हिंसाचाराचा प्रश्न येतो तेव्हा समाजही जबाबदार असतो. महिलांना समान वागणूक मिळावी, हे सुनिश्चित करणे हे समाजाचे कर्तव्य आहे. जर महिला त्यांच्या कुटुंबात सुरक्षित नसतील, तर मला कोणताही कायदा मदत करेल असे वाटत नाही. कुटुंब आणि समाजाची मानसिकतेत बदल करणे महत्त्वाचे आहे.,” असेही शर्मा यांनी सांगितले.

हेही वाचा – नीना गुप्तांनी फालतू म्हटलेल्या फेमिनिझमचा खरा अर्थ काय? स्त्रीवादी भूमिका स्वीकारणं पुरुषद्वेषी का ठरतंय?

NCRBच्या नव्या डेटानुसार,”२०२२ मध्ये संपूर्ण भारतात महिलांविरोधात घडलेल्या ४,४५२५६ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती, २०२१ मध्ये प्रत्येक तासाला जवळपास ५१अशा ४,२८२८८ एफआयआर नोंदवण्यात आल्या आणि २०२० मध्ये ही संख्या २,७१,५०३ इतकी होती.”

“प्रति लाख लोकसंख्येमागे महिलांवरील गुन्ह्यांचे प्रमाण ६६.४ इतके आहे तर अशा प्रकरणांमध्ये एफाआयर दाखल करण्याचे प्रमाण ७५.८ आहे,” असे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या NCRB ने म्हटले आहे. या आकडेवरून हे स्पष्ट होते की, महिलांच्या मानसिकता बदलत आहे गरज आहे ती समाजाने आपली मानसिकता बदलण्याची. महिलांना समान वागणूक मिळावी यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime not rising women are coming forward and complaining panel chief rekha sharma on new ncrb data snk