देशाची सेवा करण्यासाठी, लोकांचा आदर मिळवण्याचे स्वप्न पाहणारे हजारो उमेदवार दरवर्षी, अतिशय अवघड अशा UPSC, CSE सारख्या स्पर्धा परीक्षेत भाग घेऊन त्यामध्ये उत्तीर्ण होण्यासाठी धडपडत असतात. ज्यांना या परीक्षांमध्ये मनापासून उत्तीर्ण व्हायचे असते ते अत्यंत मेहनतीने, कष्टाने आणि चिकाटीने प्रयत्न करत असले तरीही त्यापैकी अनेकांनी खाजगी शिकवण्या किंवा कोचिंग लावलेले असते. मात्र, काही उमेदवारांसाठी असे क्लासेस आणि शिकवण्या लावणे आवाक्याबाहेरचे असते. परंतु, अशाच अडथळ्यांवर मात करून आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी एक वेगळाच जोश आणि प्रोत्साहन अशा उमेदवारांना मिळत असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज आपण अशीच एक प्रेरणादायी आणि आपले ध्येय पूर्ण करण्याची जिद्द असणाऱ्या दिव्या तन्वर हिचा प्रवास पाहणार आहोत. दिव्या हरियाणा राज्यातील महेंद्रगढ येथील रहिवासी आहे. दिव्याने तिचे प्राथमिक शालेय शिक्षण सरकारी संस्थांमधून पूर्ण केल्यांनतर, तिची महेंद्रगडच्या नवोदय विद्यालयात निवड झाली. अतिशय गरीब परिस्थितीतून भारतातील सर्वाधिक मागणी असणाऱ्या नोकरी मिळवण्याचा IAS तन्वीचा हा प्रवास आहे. सरकारी शाळेत शिक्षण घेऊन चिकाटीने आणि मेहनतीने तिने जे करून दाखविले आहे ते अनेक यूपीएससी उमेदवारांना प्रेरणा देणारे ठरणारे आहे.

हेही वाचा : लहान वयात लग्नाला नकार; घर सोडले, नोकरी केली, परदेशात जाऊन पूर्ण केले मास्टर्स! ही तरुणी ठरतेय सर्वांचा आदर्श

IAS दिव्याला स्पर्धा परीक्षांसाठी कोणतीही शिकवणी लावणे आर्थिकदृष्ट्या शक्य नव्हते. मात्र, परीक्षेची तयारी करण्यासाठी तिने अनेक ऑनलाइन सोर्स, सराव परीक्षांची मदत घेतली. दिव्याला तिच्या मेहनतीचे फळ २०२१ मध्ये मिळाले. तिने स्पर्धा परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात ४३८ वा ऑल इंडिया रँक मिळवला होता. तिच्या जिद्दीमुळेच दिव्या केवळ २१ व्या वर्षी भारतातील सर्वात तरुण IPS अधिकारी बनली होती.

मात्र, दिव्या इतक्यावर थांबली नाही. तिने २०२२ साली पुन्हा एकदा यूपीएससी सीएसई परीक्षा दिली. पुन्हा एकदा तिला स्पर्धा परीक्षेमध्ये घवघवीत यश प्राप्त झाले. या वेळेस दिव्याने अखिल भारतीय १०५ क्रमांक पटकावला होता. कोणत्याही शिकवण्यांची कोचिंगची मदत न घेता, स्वतः चिकाटीने आणि मेहनतीने अभ्यास करून तिने IAS होण्याचे स्वप्न पूर्ण केले.

IAS दिव्या तन्वरचे इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर एक लाख ५८ हजारांहून अधिक फॉलोवर्स आहेत. ती तिच्या सोशल मीडियावरून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या वा देऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला सतत प्रोत्साहन देत असते. UPSC ही सर्वात प्रतिष्ठित परीक्षा असून, ती भारत सरकारच्या यंत्रणेचा आधार आहे. भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय महसूल सेवा, भारतीय पोलिस सेवा आणि भारतीय प्रशासकीय सेवा यांमधील पदांसाठी यूपीएससी परीक्षांमार्फत संधी मिळवता येऊ शकते, अशी माहिती डीएनएच्या एका लेखातून समजते.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How is divya tanwar who cleared upsc cse exam and become youngest ips officer how she prepared check out chdc dha
First published on: 24-05-2024 at 20:40 IST