देशातील सर्वांत कठीण परीक्षांपैकी एक म्हणजे NEET परीक्षा. ही परीक्षा उत्तीर्ण करणे तितकेसे सोपे नाही. दिवस-रात्र अभ्यास करून व कठोर परिश्रम घेऊनही अनेक विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण करू शकत नाहीत आणि मग ते अखेर हार मानून पुन्हा प्रयत्न करणे सोडून देतात. मात्र, आज आम्ही तुम्हाला अशा विद्यार्थिनीबद्दल सांगणार आहोत; जिने अनेक संकटांचा सामना करून ही NEET परीक्षा उत्तीर्ण केली. आरती झा, असे त्या विद्यार्थिनीचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- यूपीएससीसाठी इंजिनिअरिंगला केला रामराम; कोचिंगशिवाय बनली आयपीएस अधिकारी, कोण आहे यूपीची दबंग अंशिका वर्मा?

आरती झा हिने वयाच्या केवळ २१ व्या वर्षी NEET ची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. मात्र, तिचा हा प्रवास सोपा नव्हता. आरतीचे वडील ट्रक मेकॅनिक; तर आई गृहिणी आहे. आरतीच्या घरी आर्थिक चणचण आहे. आरतीचे वडील महिन्याला केवळ २० हजार रुपये कमवतात. त्यातूनच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. याच पैशांमधून थोडी थोडी बचत करीत आरतीच्या कुटुंबीयांनी तिच्या शिक्षणासाठी पैसे जमवले होते.

हेही वाचा- एकेकाळी मिस इंडिया होण्याचे स्वप्न पाहत होती, आज आहे IAS अधिकारी! तस्कीन खानची यथोगाथा

पैशांच्या बचतीसाठी रोज तीन कि.मी. पायी प्रवास

आरती झाचे कोचिंग सेंटर तिच्या घरापासून १७ किमी दूर होते. आरतीबरोबर शिकणारे इतर विद्यार्थी कोचिंग क्लासला जाण्यासाठी बसने प्रवास करायचे मात्र, आरती बसचे १० रुपये वाचवण्यासाठी अर्धा प्रवास म्हणजे दररोज ३ किलोमीटर चालत जायची. एवढंच नाही तर कुटुंबाला हातभार लागावा व शिक्षणाचा खर्च निघावा यासाठी आरतीने शिकवणी वर्ग घेण्यासही सुरुवात केली. मात्र, दिवसभरच्या या धावपळीमुळे आरती थकून जायची व त्याचा तिच्या NEET परीक्षेच्या तयारीवर परिणाम होत होता.

हेही वाचा- अविवाहित गरोदर स्त्रियांनादेखील मिळू शकते का ‘Maternity Leave?’ कायद्यामध्ये नेमके काय ते जाणून घ्या…

पंखा बंद ठेवून अभ्यास

आरती मुद्दाम विजेशिवाय अभ्यास करायची. झोप येऊ नये आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित व्हावे म्हणून आरती पंखा बंद ठेवून परीक्षेचा अभ्यास करायची. कठोर मेहनत व प्रयत्नांच्या जोरावर आरतीने ‘नीट’ परीक्षा उत्तीर्ण करीत तिच्या स्वप्नांचा एक टप्पा पूर्ण केला. NEET २०२३ मध्ये १९२ वी रँक आणि ओबीसी श्रेणीमध्ये ३३ वी रँक मिळवली. तिचे दोन भाऊ सध्या एसएससी परीक्षेची तयारी करीत आहेत. आरती झा ही तिच्या कुटुंबातून पहिली डॉक्टर होणार आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neet ug topper aarti jha cracks neet ug daughter of truck mechanic shares study plan dpj