प्रश्न : मी एक ४८ वर्षांचा विवाहित पुरुष असून माझी पत्नी ४४ वर्षांची आहे. गेल्या वर्षभरात माझ्या पत्नीची मासिक पाळी खूपच अनियमित झाली आहे. तिची पाळी बंद होण्याची वेळ आली आहे, असं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं. मासिक पाळी बंद होताना खूप त्रास होतो, असं मी ऐकलं आहे. हे खरं आहे का ? तिला होणारा हा त्रास कमी करण्यासाठी मी एक पती म्हणून काही करू शकतो का ?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : उर्फी जावेद…बाई अंगभर नाही पण निदान शोभतील असे कपडे घाल!

उत्तर : स्त्रीच्या वयाच्या साधारणपणे ४२ ते ५२ च्या दरम्यान कधीही हळूहळूपणे पाळी येणं बंद होतं. असं होण्याच्या सुमारास सुरुवातीस पाळीमधे अनियमितपणा येतो. कधी पाळी खूप उशीरा येणं, तर कधी लवकर येणं घडू लागतं. होणारा रक्तस्त्रावही कधी कमी, तर कधी जास्त काळ होऊ लागतो. या काळातच शरीरातून अचानक वाफ़ा येत आहेत, असं अनेकदा वाटू लागत. स्वभावात चिडचिडेपणा, काळजी, उदासपणा, वैराग्य असे भाव वारंवार उमटू लागतात. झोप न येणं, भूक मंदावणं किंवा खूप भूक लागणं असं होऊ लागतं. या वेळी पत्नीला समजून जरुरीचं असतं. आयुष्यभर जोपासलेल्या नात्याच्या परीक्षेचा असाच तो काळ असतो. या काळात तिला हळुवार मानसिक जवळीक हवी असते. सांभाळून घेणाऱ्या आपल्या हक्काच्या माणसांचा सहवास हवा असतो. या भावनिक गरजा पूर्ण झाल्यास स्त्री या बदलाच्या काळातून अधिक कणखर होऊन बाहेर येते आणि एक प्रेमळ आजी व समजूतदार सासू ही तिची नवीन रूपं आकार धरू लागतात. पाळी येणं ही स्त्रीच्या स्त्रीत्वाची अमूल्य अशी अभिव्यक्ती आहे. प्रत्येक स्त्रीला माता होण्याची ओढ निसर्गप्रेरणेनेच मिळाली आहे. मातृत्वाचं सुख हे स्त्री जीवनातलं सर्वात उच्च असं सुख आहे. स्त्री माता होण्यास ‘क्षम’ आहे याचं व्यक्त स्वरूप म्हणजेच मासिक पाळी येणं.

आणखी वाचा : प्रेग्नन्सीमध्ये ‘या’ महिन्यात शारीरिक संबंध चुकूनही ठेऊ नका, नाहीतर…

अनियमित पाळी
प्रश्न : माझी पाळी नियमित येत नाही. नेहमी ती दोन-तीन दिवस आधी किंवा तीन-चार दिवस उशिरा येते. कधी अंगावरून तीन दिवस जातं, तर व सहा-सात दिवस जातं. या अनियमितपणावर काही उपाय आहे का ?
उत्तर : अनेक स्त्रियांमधे मासिक पाळी काही दिवस लवकर किंवा उशिरा येते; तसंच होणारा रक्तस्त्रावही एक-दोन दिवस कमी किंवा एक-दोन दिवस जास्त होतो. असं होणं म्हणजे दर वेळी अयोग्य किंवा ॲबनॉर्मल असतं असं समजू नये. येणारी प्रत्येक पाळी विशिष्ट दिवसांनीच व अगदी नियमितच यायलाच हवी, असाही काही नियम नाही. पाळी ३ ते ४ दिवस लवकर किंवा उशि‍रा येण्याचा प्रकार बहुतांशी सर्वच स्त्रियांमधे कधी ना कधी घडत असतो. यासा दर वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याची किंवा औषध उपचारांची गरज असत नाही.

आणखी वाचा : महिला कर्मचाऱ्यांना नोकरी देण्यात TCS अव्वल!

प्रश्न विचारा बेधडक
तुम्ही तुमचे सेक्सविषयीचे प्रश्न बेधडक विचारा. लैंगिक विज्ञानतज्ञ डॉ. राजन भोसले तुमच्या प्रश्नांची दर सोमवारी इथे उत्तरे देतील. तुम्हाला तुमचं नाव प्रसिद्ध करायचं नसेल तर तसं कळवा. तर पाठवा आम्हाला तुमचे प्रश्न – lokwomen.online@gmail.com या ईमेल आयडीवर. सब्जेक्टमध्ये ‘कामजिज्ञासा’ असा उल्लेख अवश्य करा.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sexual question answers when does menopause starts vp
First published on: 05-12-2022 at 07:42 IST