scorecardresearch

प्रेग्नन्सीमध्ये ‘या’ महिन्यात शारीरिक संबंध चुकूनही ठेऊ नका, नाहीतर…

प्रेग्नन्ट महिलांनी शारीरिक संबंध ठेवताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. नाहीतर अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात.

प्रेग्नन्सीमध्ये ‘या’ महिन्यात शारीरिक संबंध चुकूनही ठेऊ नका, नाहीतर…
फोटो: प्रतिनिधिक

Physical Relation During Pregnancy: गरोदरपणात अनेक गोष्टींबाबत शंका असते. गरोदरपणात शारीरिक संबंध यापैकी एक आहे. काही स्त्रियांना गरोदरपणात शारीरिक संबंध ठेवणे म्हणजे अस्वस्थ वाटतं. महिलांच्या मनातही विविध प्रकारचे प्रश्न येतात. उदाहरणार्थ, कोणत्या महिन्यापर्यंत गरोदरपणात शारीरिक संबंध ठेवणे सुरक्षित आहे किंवा गरोदरपणात शारीरिक संबंध ठेवण्याचे किंवा न ठेवण्याचे काही दुष्परिणाम आहेत का. चला तर मग जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर माहिती…

प्रेग्नन्सी मध्ये शारीरिक संबंध ठेवणे कधी सुरक्षित आहे?

लिब्रेटवर (Lybrate) प्रसिद्ध झालेल्या लेखानुसार, दिल्लीतील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. उमा म्हणतात की, प्रेग्नन्सी दरम्यान शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दुसरा त्रैमासिक हा सर्वात सुरक्षित असतो, परंतु यामध्ये महिलेची परवानगी असणे महत्त्वाचे आहे. जर एखाद्या महिलेची गर्भधारणा स्वस्थ असेल, सर्वकाही सामान्य असेल, तर दुसऱ्या तिमाहीपासून शारीरिक संबंध ठेवण्यास काही हरकत नाही.

डॉ.उमा सांगतात की, अनेक महिलांना गरोदरपणात शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा नसते. हे सामान्य आहे. अशा स्थितीत शारीरिक संबंध केलेच पाहिजेत असे नाही. इतर अनेक मार्ग आहेत जे तुम्ही आणि तुमचा जोडीदार तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी निवडू शकता जसे की एकमेकांना प्रेम देणे, मिठी मारणे.

( हे ही वाचा: आई व्हायचंय? तर प्रेग्नंसीसाठी ‘या’ दिवसात शरीरसंबंध ठेवणं महत्वाचं)

प्रेग्नन्सीमध्ये सेक्स केल्याने बाळाचे नुकसान होते का?

डॉक्टरांच्या मते, गर्भाशयाचे मजबूत स्नायू आणि अम्नीओटिक पिशवी बाळाला गर्भात पूर्णपणे सुरक्षित ठेवतात. म्हणूनच गरोदरपणात शारीरिक संबंध ठेवल्यास बाळाचे कोणतेही नुकसान होऊ शकत नाही. होय, शारीरिक नंतर, बाळाची काही हालचाल नक्कीच जाणवते, परंतु याचा अर्थ असा नाही की बाळाची काळजी करण्याची गरज आहे.

प्रेग्नन्सी मध्ये शारीरिक संबंध कधी ठेवू नयेत?

गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात शारीरिक संबंध टाळले पाहिजेत अशा परिस्थितींमध्ये प्रामुख्याने रक्तस्त्राव किंवा जोखीम घटकांचा समावेश होतो. तुमच्या गरोदरपणात कोणत्याही प्रकारचा धोका असेल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात काही डाग किंवा रक्तस्त्राव होत असल्यास, अशा परिस्थितीत डॉक्टर किमान १४ आठवडे लैंगिक संबंध ठेवू नयेत अशी शिफारस करतात.

( हे ही वाचा: सॅनिटरी पॅड्समधल्या ‘या’ रसायनामुळे कॅन्सरचा धोका? जाणून घ्या नेमकं प्रकरण काय)

याशिवाय जर स्त्रीला गर्भाशय ग्रीवेचा आजार, जास्त रक्तस्त्राव, योनीमार्गात संसर्ग किंवा प्लासेंटा खालच्या भागात असेल तर ते सेक्स करणे टाळावे. याशिवाय, ज्या गर्भवती महिलेला वारंवार पोटदुखी किंवा क्रॅम्प्सचा त्रास होत असेल त्यांनी गर्भधारणेदरम्यान शारीरिक संबंध टाळावेत. मेयो क्लिनिकच्या मते, गर्भधारणेच्या सहाव्या ते बाराव्या आठवड्यापर्यंत लैंगिक संबंध टाळावेत, कारण त्यामुळे गर्भपात होऊ शकतो. गर्भावस्थेच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये लैंगिक संबंध देखील टाळले पाहिजे, कारण अम्नीओटिक द्रवपदार्थ गळतीचा धोका असतो, ज्यामुळे मोठी समस्या होऊ शकते.

मराठीतील सर्व चतुरा ( Women ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-12-2022 at 14:35 IST

संबंधित बातम्या