Kolkata Rape-Murder : कोलकाता येथील महिला डॉक्टरवर बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर या डॉक्टरची क्रूरपणे हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण देश हादरला. या प्रकरणी पश्चिम बंगालच्या सालदाह न्यायालयाने आरोपी संजय रॉयच्या वकील म्हणून कविात सरकार यांची नियुक्ती केली आहे. या कविता सरकार कोण आहेत आपण जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकी घटना काय घडली?

९ ऑगस्टला सकाळी एक महिला डॉक्टर आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातल्या ( R.G. Kar Hospital ) सेमिनार हॉलमध्ये मृतावस्थेत आढळली. तिचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत होता. तिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं तेव्हा तिच्यावर बलात्कार झाला असल्याची बाब समोर आली. तिच्या शरीरावर आणि गुप्तांगावर अनेक जखमा ( Kolkata Rape-Murder ) होत्या. तिच्या डोळ्यांमधूनही रक्त वाहात होतं अशीही माहिती समोर आली. त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या मुलीला न्याय दिला पाहिजे अशी मागणी होते आहे. अत्यंत क्रूर पद्धतीने तिची हत्या ( Kolkata Rape-Murder ) करण्यात आली. त्याआधी तिच्यावर पाशवी बलात्कार करण्यात आला. या प्रकरणात आरोपी संजय रॉयला पोलिसांनी अटक केली आहे. याच संजय रॉयचं वकीलपत्र एका महिला वकिलाने घेतलं आहे.

हे पण वाचा- Kolkata Rape and Murder : “सोनागाछीला येऊन तुमची शारिरीक भूक भागवा, पण बलात्कार..”; कोलकात्यातील देहविक्री करणाऱ्या महिलांचं आवाहन

संजय रॉयचं कृत्य माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य

संजय रॉयने केलेलं कृत्य हे अत्यंत क्रूर आणि माणुसकीला काळीमा ( Kolkata Rape-Murder ) फासणारं आहे. देशभरात संजय रॉयच्या या क्रूर कृत्याच्या बातम्याही झाल्या, तसंच संजय रॉय आणि आर. जी. कर महाविद्यालय तसंच रुग्णालयातलं प्रकरण ( Kolkata Rape-Murder ) चर्चिलं गेलं. बंगालच नाही तर संपूर्ण देश या घटनेने हादरला. या घटनेनंतर आंदोलनंही करण्यात आली. संजय रॉयचं वकीलपत्र कुणीही घेऊ नये अशी मागणीही करण्यात आली. दरम्यान आता या सालदाह न्यायालयाने आरोपी संजय रॉयचं वकीलपत्र एका महिला वकिलाला दिलं आहे. कविता सरकार असं या महिला वकिलाचं नाव आहे. या महिला वकिलाची नियुक्ती न्यायालयातर्फे करण्यात करण्यात आली आहे.

पाकिस्तानातील दहशतवाद्यालाही देण्यात आला होता वकील

पाकिस्तानातील दहशतवादी अजमल आमिर कसाब आणि निर्भया प्रकरणातील सहा आरोपींनाही वकील देण्यात आला होता. त्याचप्रमाणे कविता सरकार यांना ही जाबाबदारी देण्यात आली आहे.ज्या प्रमाणात जनक्षोभ उसळला त्यानंतर बहुतांश वकिलांनी आरोपी संजय रॉयचं वकीलपत्र घेण्यास नकार दिला होता. आता सेलदाह न्यायालयाने कविता सरकार यांची या प्रकरणात आरोपी संजय रॉयच्या वकील म्हणून नियुक्ती केली आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

कविता सरकार यांनी संजय रॉयला दिली पॉलिग्राफ चाचणीची माहिती

कविता सरकार म्हणाल्या, संजय रॉयला पॉलिग्राफ चाचणीबाबत सगळी माहिती मी दिली. त्याला सगळं समजल्यानंतर त्याने या चाचणीसाठी होकार दिला. त्याने मला हेदेखील सांगितलं की तो प्रचंड तणावाखाली आहे. त्याने गुन्हा केला आहे तरीही या प्रकरणातलं सत्य बाहेर यावं असं त्याने म्हटलं आहे.

कविता सरकार कोण आहेत?

कविता सरकार या ५२ वर्षीय वकील आहेत. तसंच त्या लिगल एड डिफेन्स कौन्सिलच्या सदस्य आहेत. कविता यांनी त्यांचं शिक्षण हुगळी मोहसिन महाविद्यातून पूर्ण केलं आहे. अलिपोर कोर्टातून त्यांनी त्यांची कारकीर्द सुरु केली. मागच्या वर्षी त्यांची सेलदाह न्यायालयात बदली कऱण्यात आली. कविता सरकार यांना २५ वर्षांचा वकिलीचा अनुभव आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman is representing rg kar rape and murder accused in court do you know who is she chdc scj