विश्वचषकाच्या साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात वेस्ट इंडिजने युएईविरूद्ध ६ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह विंडीजने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. कर्णधार जेसन होल्डर आणि जेरॉम टेलरच्या भेदक मा-यासमोर यूएईता संपूर्ण डाव १७५ धावांत आटोपला. विंडीजने हे आव्हान सहा विकेट आणि ११७ चेंडू राखून पूर्ण केले.
नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत युएईला फलंदाजीचे निमंत्रण दिले.  होल्डरने चार गडी तर टेलरने तीन गडी बाद करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.  विंडीज गोलंदाजांच्या भेदक माऱयापुढे नांगी टाकलेल्या युएईचा निम्मा संघ अवघ्या ४६ धावांत तंबूत परतला होता. शतकी धावसंख्या उभारण्याची कोणीतीही आशा नसलेल्या युएईने अमजद जावेद आणि नासिर अजिजच्या १०७ धावांच्या भागीदारीच्या जोरावर १७५ धावांपर्यंत मजल मारली. गोलंदाजांनी कमाल केल्यानंतर फलंदाजांनीही साजेशी कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला. १७६ धावांचे आव्हान गाठताना ३३ धावांत यूएईने विंडीजला पहिला धक्का दिला. सलमीवीर ड्वायेन स्मिथ १५ धावांवर बाद झाला. तर संघाचे अर्धशतक पूर्ण झाले आणि सॅम्युअल्स बाद झाला. त्याला केवळ ५३ धावा करता आल्या. हे दोघेही बाद झाल्यानंतर जॉन्सन चार्लेस आणि जोनाथन कार्टर यांनी प्रत्येकी अर्धशतकी खेळी केली आणि संघाला विजयाजवळ  नेऊन पोहचवले. या दोघांनी तिस-या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी केली. चार्लेस बाद झाल्यानंतर कार्टरने दिनेश रामदिनच्या साथीने ५८ धावा करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व विश्वचषक २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: West indies in quarter finals