अॅक्सिस बँक, मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस आणि मॅक्स लाइफ यांच्या संचालक मंडळांनी त्यांच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत अॅक्सिस बँकेच्या मॅक्स लाइफ इन्शुरन्समध्ये २९ टक्के हिस्सा खरेदीस मान्यता दिली.
अॅक्सिस बँकेने, मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजाराला पाठविलेल्या पत्रात ही माहिती देण्यात आली आहे. या तीन कंपन्यांनी २० फेब्रुवारी २०२० रोजी एका गोपनीयतेच्या करावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या.
सध्या मॅक्स लाइफची मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेसकडे ७२.५ टक्के, मित्सुई सुमीटोमो इन्शुरन्स कंपनीकडे २५.५ टक्के आणि अॅक्सिस बँकेची २ टक्के मालकी आहे.
एका करारानुसार, मित्सुई सुमीटोमो इन्शुरन्स कंपनीला त्यांच्या मॅक्स लाइफ इन्शुरन्समधील २०.६ टक्के मालकीच्या बदल्यात मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस २१.०९ टाके समभाग मिळतील. मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसे मॅक्स लाइफ चे ४.९ टक्के समभाग खरेदी करेल आणि अॅक्सिस बँक ही मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेसकडून मॅक्स लाइफ इन्शुरन्सचा हिस्सा खरेदी करेल.
या व्यवहाराच्या पूर्ततेनंतर मॅक्स लाइफ इन्शुरन्स ही मॅक्स फायनान्शियल सव्र्हिसेस आणि अॅक्सिस बँकेची अनुक्रमे ७० आणि ३० टक्के मालकी असलेली कंपनी असेल. रिझव्र्ह बँक आणि विमा नियमन आणि विकास प्राधिकरण आणि भारतीय स्पर्धा आयोगाच्या मान्यतेनंतर या कराराची पूर्तता होणार आहे.
या पूर्ततेनंतर मॅक्स लाईफ इन्शुरन्सच्या नावात अॅक्सिस बँकेची नाममुद्रा जोडली जाईल. सध्या मॅक्स लाइफ इन्शुरन्स ही देशातील चौथ्या क्रमांकाची विमा कंपनी आहे.