स्वयंपाकाच्या वायूसाठी गेल्या पाच महिन्यांमध्ये देशभरात ५३ लाख नवे जोडण्या देण्यात आल्या असल्या तरी चालू महिन्याच्या सुरुवातीपर्यंत यासाठीची प्रतिक्षा यादी ४ लाखांहून अधिक आहे. लोकसभेत लेखी प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय तेल व वायू मंत्री वीराप्पा मोईली यांनीच ही माहिती शुक्रवारी दिली. यानुसार, ऑक्टोबर २०१२ ते फेब्रुवारी २०१२ दरम्यान ५२ लाख ९३ हजार ४८५ नव्या जोडण्या दिल्या गेल्या आहेत. तर १ मार्च २०१३ पर्यंत ही मागणी असणारे नवे ग्राहक ४ लाख ३१ हजार ८५६ अद्यापही प्रतिक्षित आहेत. पुढील महिन्यात या सर्वाना नव्या जोडण्या दिल्या जातील, अशी ग्वाहीही यानिमित्ताने देण्यात आली आहे. देशात इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तेल व वायू विपणन कंपन्यांमार्फत तेल इंधनाबरोबच स्वयंपाकाच्या वायूचाही पुरवठा होतो. उपरोक्त गेल्या पाच महिन्याच्या कालावधीत सर्वाधिक नव्या जोडण्या अर्थातच सर्वात मोठय़ा उत्तर प्रदेशात (७.४४ लाख) दिल्या गेल्या आहेत. महाराष्ट्र याबाबत ५.३८ लाख नव्या जोडण्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Mar 2013 रोजी प्रकाशित
एलपीजीचा‘काला बाजार’!
स्वयंपाकाच्या वायूसाठी गेल्या पाच महिन्यांमध्ये देशभरात ५३ लाख नवे जोडण्या देण्यात आल्या असल्या तरी चालू महिन्याच्या सुरुवातीपर्यंत यासाठीची प्रतिक्षा यादी ४ लाखांहून अधिक आहे. लोकसभेत लेखी प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय तेल व वायू मंत्री वीराप्पा मोईली यांनीच ही माहिती शुक्रवारी दिली. यानुसार, ऑक्टोबर २०१२ ते फेब्रुवारी २०१२ दरम्यान ५२ लाख ९३ हजार ४८५ नव्या जोडण्या दिल्या गेल्या आहेत.

First published on: 23-03-2013 at 12:07 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Black marketing of lpg