दोन दिवसांच्या नुकसानानंतर तीन आठवडय़ांच्या नीचांकातून बाहेर येत सेन्सेक्सने बुधवारी वाढ राखली. १३८.७८ अंश वधारणेमुळे सेन्सेक्स २६,५०० च्या वर, २६,६३१.२९ पर्यंत पोहोचला. तर निफ्टी ४२.६० अंश वधारणेसह ८ हजारांच्या नजीक, ७,९७५.५० वर गेला.
अमेरिकेची मध्यवर्ती बँक- फेडरल रिझव्र्हने तिचे किमान व्याजदर कायम ठेवण्याच्या तसेच भारत दौऱ्यावर असलेल्या चीनच्या राष्ट्राध्यक्षांकडून आपल्या बँकांमध्ये नव्याने निधी ओतले जाण्याच्या आशेवर येथील
मुंबई निर्देशांकाने गेल्या सलग दोन दिवशी ५६८.५३ अंश घसरण नोंदविली आहे. बुधवारी २६,५०० च्या वर येतानाच बाजाराने ही घट मोडून काढली. मंगळवारी सेन्सेक्स एकाच व्यवहारात तब्बल ३२४ अंश घसरण नोंदवीत जवळपास दोन महिन्यांच्या तळाला पोहोचला होता. तर निफ्टीनेही त्याचा ८ हजारांचा स्तर सोडला होता.
व्याजदर निश्चितीबाबत अमेरिकेच्या फेडरल रिझव्र्हची दोन दिवसांची बैठक बुधवारी उशिरा संपत आहे. तर चीनच्या मध्यवर्ती बँकेने तेथील पाच आघाडीच्या सार्वजनिक बँकांमध्ये ५०० अब्ज युआन गुंतवण्याचे निश्चित केल्याने एकूणच आंतरराष्ट्रीय भांडवली बाजारांमध्ये तेजीचे वारे होते.
मुंबई शेअर बाजारातील १२ पैकी १० क्षेत्रीय निर्देशांक वधारले. तर सेन्सेक्समधील २० समभागांचे मूल्य उंचावले. यामध्ये डॉ. रेड्डीज लॅब, इन्फोसिस, टाटा पॉवर, भेल, टाटा स्टील, हिरो मोटोकॉर्प, टाटा मोटर्स, विप्रो, एनटीपीसी यांचे समभाग २.५ टक्क्यांपर्यंत वधारले. माहिती तंत्रज्ञान निर्देशांक सर्वाधिक १.५ टक्क्यांसह वधारला.
रुपयाही उंचावला
डॉलरच्या तुलनेत रुपया बुधवारी १३ पैशांनी भक्कम होत ६०.९२ पर्यंत उंचावला. चलनाने मंगळवारीही ८ पैशांची वाढ राखली होती. असे करताना रुपया ६१ च्या वर येत महिन्यातील नीचांकातूनही बाहेर आला होता. चलनाने सलग दुसऱ्या सत्रात ६१ च्या खालचा प्रवास करत चिंता वाढविली होती. मंगळवारी ६१ पर्यंत घसरल्यानंतर चलन दिवसअखेर सावरले होते. बुधवारी ते अधिक भक्कम बनले. सत्रा दरम्यान ते ६१.०३ पर्यंत घसरल्यानंतर ६०.८९ पर्यंत उंचावले.
संग्रहित लेख, दिनांक 18th Sep 2014 रोजी प्रकाशित
‘फेड’ धाकधूक लोपली; ‘सेन्सेक्स’ला उभारी
दोन दिवसांच्या नुकसानानंतर तीन आठवडय़ांच्या नीचांकातून बाहेर येत सेन्सेक्सने बुधवारी वाढ राखली. १३८.७८ अंश वधारणेमुळे सेन्सेक्स २६,५०० च्या वर, २६,६३१.२९ पर्यंत पोहोचला.

First published on: 18-09-2014 at 03:16 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bse sensex rebounds 127 points on global cues