रत्नागिरी येथील स्वामी स्वरुपानंद सहकारी पतसंस्थेच्या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन नुकतेच सहकार आयुक्त मधुकर चौधरी यांच्या हस्ते झाले. कोकण विभागातील हे एकमेव शासनमान्य प्रशिक्षण केंद्र ठरले आहे. सहकार कायद्यात नुकत्याच झालेल्या बदलाच्या पाश्र्वभूमीवर अशा प्रकारच्या प्रशिक्षणाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन करीत यावेळी चौधरी यांनी पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांचे अभिनंदन केले. पतसंस्थेचा वित्तीय आढावा घेत चौधरी यांनी संस्थेच्या ९९.६८ टक्के वसुलीबाबत कौतुकोद्गारही काढले. यावेळी विभागीय सहनिबंधक मोरे, जिल्हा उपनिबंधक गंडाळ, सिंधुदुर्गचे जिल्हा उपनिबंधक कुलकर्णी, आरडीसीसी बँकेचे व्यवस्थापक दिवाकर आदी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 6th Mar 2013 रोजी प्रकाशित
स्वामी स्वरुपानंद पतसंस्थेचे रत्नागिरीत सहकार प्रशिक्षण केंद
रत्नागिरी येथील स्वामी स्वरुपानंद सहकारी पतसंस्थेच्या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन नुकतेच सहकार आयुक्त मधुकर चौधरी यांच्या हस्ते झाले. कोकण विभागातील हे एकमेव शासनमान्य प्रशिक्षण केंद्र ठरले आहे.
First published on: 06-03-2013 at 12:18 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Co operative training centre at ratnagiri