राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यास स्थानिक संस्था कर-एलबीटी रद्द करण्यात येईल, असे आश्वासन भाजप नेते विनोद तावडे यांनी राज्यातील लघुउद्योजकांना दिले.
‘महाराष्ट्र लघू व मध्यम उद्योग’ (एमएसएमईएस)च्या पाचव्या वार्षिक परिषदेचे उद्घाटन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या हस्ते नुकतेच वांद्रे येथे झाले. त्या वेळी ते बोलत होते. ‘महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळा’चे अध्यक्ष कमांडर दीपक नाईक, उपाध्यक्षा मीनल मोहाडीकर, ‘आयईएस’चे अध्यक्ष सतीश लोटलीकर तसेच लघू व मध्यम उद्योग क्षेत्रातील अनेक उद्योजक या वेळी उपस्थित होते. राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर संभाव्य सरकारमध्ये निर्णयप्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा धोरण लकवा राहणार नाही, तसेच आमचे सरकार हे भ्रष्टाचारमुक्त असेल, असे तावडे यांनी या वेळी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 11th Sep 2014 रोजी प्रकाशित
महायुती सत्तेवर आल्यास ‘एलबीटी’ रद्द करू : तावडे
राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यास स्थानिक संस्था कर-एलबीटी रद्द करण्यात येईल, असे आश्वासन भाजप नेते विनोद तावडे यांनी राज्यातील लघुउद्योजकांना दिले.
First published on: 11-09-2014 at 03:37 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Exempt lbt after come mahayuti in power vinod tawade