Freedom 251 स्वस्तातील मोबाइल म्हणून चर्चेत आलेल्या आणि मालकीवरून वादात सापडलेल्या ‘रिंगिग बेल’च्या २५१ रुपयांच्या मोबाइल फोनसाठी चार महिन्यांपूर्वी नोंदणी केलेल्या ग्राहकांना त्याचे प्रत्यक्षात वितरण शुक्रवारपासून सुरू होत आहे.
नोएडास्थित रिंगिंग बेल्स कंपनीने ‘फ्रीडम २५१’ नावाचा हा फोन बाजारात आणला असून आकाराने ४ इंच असलेल्या या फोनची किंमत वितरण खर्चासह (रु. ४०) २९१ रुपये इतकी आहे. या फोनसाठी नोंदणी झालेल्या २ लाख ग्राहकांपैकी पहिल्या टप्प्यात ५,००० जणांना तो लॉटरी पद्धतीने सोडत काढून वितरित केला जाणार आहे. ३० जूनपासून २ लाख फोन वितरित करण्याची घोषणा कंपनीने गेल्या महिन्यात केली होती. मात्र ही संख्या देशातील १९ राज्यांमध्ये १०,००० अशी खाली आणली गेली.
संग्रहित लेख, दिनांक 8th Jul 2016 रोजी प्रकाशित
Freedom 251: ‘फ्रीडम २५१’ फोनचे आजपासून वितरण
चार महिन्यांपूर्वी नोंदणी केलेल्या ग्राहकांना त्याचे प्रत्यक्षात वितरण शुक्रवारपासून सुरू होत आहे.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
Updated:

First published on: 08-07-2016 at 07:31 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Freedom 251 deliveries from today