प्रत्येक नोकरी करणाऱ्या व्यक्तीला आपल्या भविष्याची काळजी लागून राहिलेली असते. कारण, नोकरीचा कार्यकाळ पुर्ण झाल्यानंतर त्याला निवृत्त व्हावं लागणार असतं. त्यामुळे नोकरी करणं थांबवल्यानंतर पगार देखील आपोआप बंद होतो. पण घरातील खर्च कमी होत नाही. त्यामुळे निवृत्तीनंतरही तुमच्याकडे पैसे येण्याचा एखादा मार्ग उपलब्ध असेल तर तुम्हाला वृद्धापकाळात पैशाची कमी भासणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यासाठीच तुम्हाला आम्ही आज अशा गुंतवणुकीबाबतची माहिती देणार आहोत की, त्यामुळे वयाच्या साठीनंतरही पैशाची कमी भासणार नाही. बाजारात सध्या अनेक प्रकारच्या गुंतवणूक आणि पेन्शन योजना उपलब्ध आहेत. त्या तुम्हाला ६० वर्षांनंतर नियमित उत्पन्न मिळवून देऊ शकतात.

आणखी वाचा- प्रत्यक्ष कराच्या संकलनात यंदा ३० टक्क्यांनी वाढ शक्य

याच योजनांपैकी एक आहे ती ‘नॅशनल पेन्शन सिस्टम’ (NPS). ही एक उत्तम पेन्शन योजना असून तिच्यात गुंतवणूक केल्यामुळे तुम्हाला केवळ पेन्शनच नव्हे तर टॅक्सपासून सूटका देखील मिळते. त्यामुळे नोकरदार वर्गाला मासिक खर्चाची चिंता करण्याची गरज भासणार नाही. तर जाणून घेऊयात या योजनेच्या गुंतवणुकीची आणि परताव्याची माहिती.

‘नॅशनल पेन्शन सिस्टम’ म्हणजे काय?

‘नॅशनल पेन्शन सिस्टीम’ ही सेवानिवृत्तीनंतरचे नियोजन आणि गुंतवणुकीसाठीची उत्कृष्ट योजना आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुमचे भविष्याबाबतचे चांगले नियोजन होऊ शकते. ही सरकारद्वारे चालवली जाणारी ‘कंट्रीब्यूटरी’ पेन्शन योजना आहे. ज्यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला निवृत्तीनंतर मोठा निधी मिळतो. यासोबतच तुम्हाला गुंतवणुकीच्या आधारे दर महिन्याला Annuity रक्कम म्हणजेच पेन्शनही मिळते. ही योजना सरकारने २००४ मध्ये सुरू केली होती. या योजनेत कोणतीही नोकरी करणारी व्यक्ती गुंतवणूक करु शकते.

असे उघडाल खाते –

NPS योजनेत जमा केलेल्या पैशाची जबाबदारी PFRDA द्वारे नोंदणीकृत पेन्शन फंड व्यवस्थापकांकडे देण्यात येते. ते गुंतवणुकदारांचे पैसे सरकारी आस्थापणांमध्ये गुंतवतात. त्यामुळे गुंतवणुकदारांना दीर्घ मुदतीत चांगला परतावा मिळतो. या योजनेसाठी दोन प्रकारे उघडले जाते. पहिले खाते हे निवृत्तीचे, तर दुसरे खाते वॉलेट खाते असते. मात्र, निवृत्तीचे खाते असेल तरच वॉलेट खाते उघडता येते. दरम्यान, टियर-१ मध्ये किमान ५०० रुपये गुंतवू शकतो. तर टियर-२ साठी किमान १००० रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे.

प्रत्येक महिन्याला मिळणार परतावा –

आणखी वाचा- ठेवींमधील संथ वाढ चिंताजनक; रिझव्‍‌र्ह बँक गव्हर्नरांचे आज बँकप्रमुखांबरोबर मंथन

या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर ५१ हजारापेक्षा अधिकची पेन्शन आपणाला ६० वर्षानंतर मिळू शकते. उदाहरणार्थ, तुम्ही वयाच्या २१ व्या वर्षीच या योजनेत दररोज १५० रुपये गुंतवले, तर महिन्याला एकूण ४,५०० हजारांची गुंतवणूक होईल. ही गुंतवणूक जर तुम्ही 60 वर्षांपर्यंत केली तर, तुमची एकूण रक्कम ही २१.०६ लाख रुपये होते. तर वयाच्या ३९ व्या वर्षी, १० टक्क्यांच्या वार्षिक परताव्यावर, गुंतवणूकदाराला २.५९ कोटी रुपयांचा संपूर्ण निधी मिळू शकतो. यापैकी ६० % रक्कम गुंतवणुकदाराला एक रकमी दिली जाईल. तर उरलेली ४० टक्के रक्कम ही मासिक पेन्शनमध्ये रुपांतरीत केली जाईल.

दर महिन्याला मिळणार पेन्शन –

एनपीएस योजनेनुसार गुंतवणुकदाराला प्रत्येक महिन्याला जवळपास ५२ हजारापर्यंत पेन्शन मिळू शकते. शिवाय जेवढी जास्त रक्कम तुम्ही एन्युटीमध्ये ठेवाल तेवढा जास्त परतावा तुम्हाला मिळतो.

कसे उघडाल NPS खाते ? –

तुम्ही एनपीएस खाते ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने उघडू शकतो. ऑफलाइन खाते बँकेत जाऊन NPS फॉर्म भरुन आणि केवायसी करा, यानंतर पॅन आणि आधार कार्ड क्रमांकाचा तपशील बँकेत देऊन नोंदणीचे पैसे भरा. तर ऑनलाइन खाते उघडण्यासाठी NPS च्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करून हे खाते उघडू शकता.

आयकर सवलत –

या योजनेमध्ये तुम्हाला जवळपास २ लाखापर्यंतच्या इन्कम टॅक्सवर सूट मिळू शकते. आयकर कलम 80CCD (1), 80CCD (1b) आणि 80 CCD (2) अंतर्गत ही सूट मिळू शकते.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Get more than 50 thousand pension per month by investing rs 150 daily in nps at the age of 21 jap