लग्न आणि सणासुदीच्या काळात सोनं खरेदीकडे लोकांचा कल असतो. त्याचबरोबर गुंतवणूक म्हणून चांदीकडे पाहिलं जातं. त्यामुळे खरेदीदारांचं रोज चढउतार होण्याऱ्या सोनं-चांदीच्या भावाकडे लक्ष असतं. आज (७ जानेवारी २०२२) रोजी सोन्या चांदीचा दर थोडी घसरण झाल्याची दिसून येत आहे. आजच्या व्यवहारात सोन्याचा भाव ४ रुपयांच्या घसरणीसह ४७,४४७ रुपये प्रति १० ग्रॅमवर आहे. याशिवाय चांदीवर नजर टाकली तर त्यात प्रतिकिलो ८६ रुपयांची घसरण नोंदवली जात आहे. चांदी ०.१४ टक्क्यांनी घसरून ६०,३४० रुपये प्रति किलोवर आहे.
जागतिक बाजारात सोन्याच्या किमतीतही घसरण झाली आणि ते १८०० डॉलर प्रति औंसच्या खाली गेले आहे. आज त्यात रिकव्हरी दिसून येत आहे आणि डॉलरच्या वाढीसह ते १७९१.४ डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे. चांदीही आज ०.०३ टक्क्यांनी घसरून २२.१५५ डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे. आयबीजेएवर आजचा सोन्याचा दर २२ कॅरेट शुद्ध सोन्यासाठी ४६६८ रुपये प्रति ग्रॅम आणि २० कॅरेट शुद्ध सोन्यासाठी ४२५७ रुपये प्रति ग्रॅम आहे. १८ कॅरेट शुद्धतेचे सोने ३८७४ रुपये प्रति ग्रॅमच्या दराने उपलब्ध आहे. या दरांव्यतिरिक्त, तुम्हाला दागिन्यांच्या खरेदीवर मेकिंग चार्जेस आणि ३% जीएसटी भरावा लागेल.
आयफोन स्वस्तात घ्यायचा आहे का?, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे
सोन्याची शुद्धता अशी ओळखावी
२४ कॅरेट सोने सर्वात शुद्ध आहे, पण पूर्ण २४ कॅरेट सोन्याचे दागिने बनविणे शक्य नाही. सामान्यपणे २२ कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये ९१.६६ टक्के सोने असते. जर तुम्ही २२ कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की २२ कॅरेट सोन्यामध्ये २ कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित ५ प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.