पृथ्वीवर आढळणाऱ्या एकूण धातूंपैकी सोन्याला सर्वात जास्त मोल आहे. याला Au असे नाव देखील आहे. पिरीऑडिट टेबलमध्ये Au चा ७९ वा क्रंमाक लागतो. भारतामध्ये प्राचीन काळापासून सोन्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. आपल्याकडील अनेक राजघराण्यांमध्ये सोन्यांपासून दागिने तयार करण्याची परंपरा होती. बलाढ्य राज्यकर्ते त्यांच्या चलनामध्ये सोन्याचा समावेश करत असत. ब्रिटीशांच्या आगमनापूर्वी भारतामध्ये सोन्याची नाणी प्रचलित होती. जगातील सोन्याची सर्वात जास्त गुंतवणूक भारतामध्ये केली जाते. यात भारतीय महिलांकडे असणाऱ्या दागिन्यांचा समावेश करण्यात आला आहे. अमेरिकेद्वारे सोन्याच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर नियंत्रण ठेवले जाते. त्यांनी ठरवलेल्या किंमतीनुसार, भारतामध्ये सोन्याचे भाव वर-खाली होत असतात. २४ कॅरेट हे सोन्याचे शुद्ध रुप मानले जाते. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी ‘BIS Care app’ या अॅपची मदत घेता येते. भारत सरकारद्वारे सुरु करण्यात आलेल्या या अॅपमार्फत सोन्याच्या शुद्धतेबाबत तक्रार देखील नोंदवता येते. Read More