पुण्याच्या महानगर पालिका हद्दीतील सर्वात मोठा जमिनीचा व्यवहार तेथील आघाडीची मालमत्ता विकासक कंपनी कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेडने बुधवारी मार्गी लावला. वाकड येथे ३४ एकर जमिनीसाठी सुमारे ३५० कोटी रुपयांची किमत कंपनीने मोजली आहे.
पुण्यात निवासासाठी सर्वाधिक पसंती दिली जाणारे वाकड येथील ही जमीन मुंबई-पुणे महामार्गावरील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आणि हिंजेवाडी आयटी उद्यानाच्या जवळ आहे. कंपनीने मुंबई शेअर बाजाराला दिलेल्या सूचनेनुसार, या ठिकाणी १०० टक्के कोलते-पाटीलच्या मालकीचा निवासी आणि वाणिज्य असा मिश्र प्रकल्प साकारला जाणार असून, यातून एकूण २३ लाख चौरस फुटांचे विक्रीयोग्य क्षेत्रफळ विकसित होईल. बुधवार दिवसअखेर मुंबई शेअर बाजारात कोलते-पाटीलचा समभाग २.१५ टक्क्यांनी वधारून ७५.९० रु. पातळीवर स्थिरावला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolte patil developers does biggest land scam in pune