‘लोकसत्ता’च्या असंख्य वाचक-चाहत्यांमध्ये व्यापार-वित्त-उद्योगक्षेत्रातील अनेक मराठी मान्यवरांचाही समावेश होतो, पण या मंडळींचे ‘लोकसत्ता’वरील प्रेम त्यांनी वर्धापनदिन सोहळ्याला जातीने उपस्थित राहून व्यक्त केला. नरिमन पॉइंटस्थित एक्स्प्रेस टॉवर्सच्या दुसऱ्या मजल्यावर हिरवळीवर रंगलेल्या या सायंमैफलीत, या निमित्ताने राजकारणी, सनदी अधिकारी आणि अर्थक्षेत्रातील धुरिण एकत्र आले. बोचणाऱ्या गार वाऱ्याच्या साथीने मग देशाच्या गारठलेल्या अर्थव्यवस्थेवरही आणि नजीक येऊन ठेपलेल्या निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर उत्तरोत्तर अनिश्चित बनत चाललेल्या राजकीय वातावरणावर गरमागरम चर्चा झडणे आलेच..
एलआयसी हौसिंग फायनान्स, महिंद्र अॅण्ड महिंद्र फायनान्शियल सव्र्हिसेस, चौगुले स्टीमशिप्स, नोसिल, जेपी मॉर्गन, इंडोको रेमिडिज, कोकुयो कॅम्लिनसारख्या अनेकानेक कंपन्यांच्या संचालक मंडळावर असलेले धनंजय मुंगळे.
द इंडियन एक्स्प्रेस समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉर्ज वर्गीस व ‘केसरी टुर्स’चे व्यवस्थापकीय संचालक शैलेश पाटील.
संग्रहित लेख, दिनांक 18th Jan 2014 रोजी प्रकाशित
..जणू उद्योगमेळाच!
‘लोकसत्ता’च्या असंख्य वाचक-चाहत्यांमध्ये व्यापार-वित्त-उद्योगक्षेत्रातील अनेक मराठी मान्यवरांचाही समावेश होतो, पण या मंडळींचे ‘लोकसत्ता’वरील प्रेम त्यांनी
First published on: 18-01-2014 at 05:48 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta anniversary seems business convention