लहान मुलांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी स्थावर मालमत्ता क्षेत्रातील महिंद्र  लाइफस्पेसने ‘ग्रीन आर्मी’ उपक्रम हाती घेतला असून याअंतर्गत पहिल्या टप्प्यात एक कोटी लोकांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. या माध्यमातून पंतप्रधानांच्या ‘भारत स्वच्छ’ उपक्रमाशी ही मोहीम जोडण्याचा कंपनीचा मानस असल्याचे कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी संचालिका अनिता अर्जुनदास यांनी म्हटले आहे. मुंबईतील शाळांमधून या उपक्रमाची सुरुवात केल्यानंतर तो देशभरातील इतर शाळांमध्येही राबविला जाईल, असेही त्या म्हणाल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahindra lifespaces