मल्टि कमॉडिटी एक्स्चेंज (एमसीएक्स)ची जिग्नेश शाह प्रवर्तित फायनान्शियल टेक्नॉलॉजीज इंडिया लि. (एफटीआयएल)शी नाळ कायम जुळलेली राहिलेले अशा कलमांचा समावेश असलेल्या उभयतांमधील करारच संपुष्टात आणला जावा, अशी मागणी रिलायन्स कॅपिटलने वायदे बाजार आयोगाकडे (एफएमसी) केली आहे. एमसीएक्समधील प्रवर्तकांचा हिस्सा खरेदी करण्यात स्वारस्य दाखविणाऱ्या कंपन्यांमध्ये रिलायन्स कॅपिटल एक प्रमुख कंपनी आहे. एमसीएक्सची तिची पूर्वाश्रमीच्या प्रवर्तकांशी असलेले नाते संपविण्यासाठी हा करार संपुष्टात आणणे आवश्यक असल्याचे रिलायन्स कॅपिटलचे म्हणणे आहे. एमसीएक्सच्या ताळेबंद तपासण्यासाठी एफएमसीने नियुक्त केलेल्या प्राइसवॉटर हाऊस कूपर्स या लेखा कंपनीने याच करारावर बोट ठेवणारा अहवाल दिला आहे. अरिष्टग्रस्त नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लि. (एनएसईएल) या वस्तू वायदे बाजारात घोटाळा उघडकीस आल्यावर एफएमसीने त्याच प्रवर्तकांचा म्हणजे जिग्नेश शाह यांच्या एफटीआयएलचे एमसीएक्स या आजच्या घडीला देशातील सर्वात मोठय़ा वस्तू वायदे बाजारात दोन टक्क्यांपेक्षा अधिक भागभांडवल नसावे, असे फर्मान काढले होते. त्यानुसार एमसीएक्समधील २४ टक्के भागभांडवलाची एफटीआयला विक्री करणे क्रमप्राप्त ठरले आणि त्या संबंधाने निविदा मागविण्यात आल्या.
त्यातील एक प्रमुख निविदादार असलेल्या रिलायन्स कॅपिटलने वायदे बाजार आयोगाला धाडलेले हे दुसरे तक्रारवजा पत्र आहे. अनिल धीरूभाई अंबानी समूहातील ही प्रमुख वित्तीय सेवा कंपनी असून, तिने एमसीएक्सने दीर्घ मुदतीचे एफटीआयएलबरोबर केलेले करार संपुष्टात आणले जावेत, अशी मागणी केली आहे. अनिल अंबानी यांचे वायदे बाजारात स्वारस्य लपलेले नसून, त्यांची आयसीईएक्स आणि एनएमसीई या अन्य वस्तू वायदे बाजारातही लक्षणीय स्वरूपाची भांडवली गुंतवणूक आहे.
संग्रहित लेख, दिनांक 6th May 2014 रोजी प्रकाशित
एमसीएक्स-एफटीआयएल दरम्यानचे करार संपुष्टात आणण्याची रिलायन्स कॅपिटलची मागणी
मल्टि कमॉडिटी एक्स्चेंज (एमसीएक्स)ची जिग्नेश शाह प्रवर्तित फायनान्शियल टेक्नॉलॉजीज इंडिया लि. (एफटीआयएल)शी नाळ कायम जुळलेली राहिलेले अशा कलमांचा समावेश असलेल्या उभयतांमधील करारच संपुष्टात आणला जावा, अशी मागणी रिलायन्स कॅपिटलने वायदे बाजार आयोगाकडे (एफएमसी) केली आहे.
First published on: 06-05-2014 at 01:04 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reliance capital demand to end agreement between mcx ftil