देशातील सर्वात मोठा शेअर बाजार- एनएसई (राष्ट्रीय शेअर बाजार) वर सूचिबद्ध कंपन्यांमध्ये ‘रिटेल’ अर्थात व्यक्तिगत छोटय़ा गुंतवणूकदारांचा सहभाग हा सरलेल्या मार्च २०१५ अखेर २१.३५ टक्के असा गेल्या सहा वर्षांतील उच्चांक पातळीवर पोहोचला आहे. गेल्या वर्षभरातील तेजीमुळे वधारलेल्या शेअर बाजाराबद्दल वाढलेल्या आकर्षणातून छोटय़ा गुंतवणूकदारांचा सहभाग वाढलाच, पण त्यांच्या गुंतवणुकीचे एकूण मूल्यही आठ लाख कोटी रुपयांपल्याड वधारले आहे.
‘प्राइम डेटाबेस’कडून उपलब्ध माहितीनुसार मार्च २०१४ मधील २०.९९ टक्के स्तरावरून मार्च २०१५ अखेर ‘रिटेल’ गुंतवणूकदारांचे एनएसईवरील कंपन्यांच्या समभागांमधील मालकी २१.३५ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. विशेषत: बडय़ा संस्थांगत गुंतवणूकदारांकडून दुर्लक्षित राहिलेल्या छोटय़ा कंपन्यांकडे या गुंतवणूकदारांचा ओढा असल्याचे लक्षात येते.
मार्च २०१५ अखेर विदेशी गुंतवणूकदार संस्थांची एनएसईवरील कंपन्यांमधील भाग मालकी ही ६.४४ टक्के इतकी आहे, तर देशी संस्थात्मक गुंतवणूकदारांबाबत हेच प्रमाण ५.०१ टक्के इतके आहे. छोटय़ा व्यक्तिगत गुंतवणूकदारांकडे असलेली २१.३५ टक्क्यांची मालकी ही जून २००९ नंतरचा सर्वोच्च स्तर आहे. पण वर्षभरातील बाजार तेजीमुळे त्यांच्या गुंतवणुकीचे बाजारमूल्य गेल्या वर्षांच्या तुलनेत अधिक जास्त ०.५० टक्क्यांनी वधारले आहे.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक- निफ्टीमध्ये सामील ५० कंपन्यांमधील रिटेल सहभाग मात्र अवघा ७.३१ टक्के आहे, अव्वल १०० कंपन्यांबाबतीत हेच प्रमाण ८.१९ टक्के असे आहे. एनएसईवर सध्या १,४७१ कंपन्या सूचिबद्ध आहेत. त्यापैकी ७१२ कंपन्यांमध्ये रिटेल सहभाग उंचावला, तर ७१८ कंपन्यांमध्ये तो गेल्या वर्षांच्या मार्चच्या तुलनेत घसरला आहे.
धीरुभाईंची ‘पुण्याई’ आजही उपयोगी!
शेअर बाजारात सामान्य गुंतवणूकदारांचा वावर वाढेल आणि ही गुंतवणूक सर्वतोमुखी करण्यात धीरुभाई
झुनझुनवालांच्या मत्तेत वर्षभरात ५८% वाढ
देशाच्या शेअर बाजारातील अब्जाधीश गुंतवणूकदार अशी ओळख असलेल्या राकेश झुनझुनवाला हेच आज