बँकिंग क्षेत्रात नोकरीची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी ही बातमी आहे. सरकारी नोकऱ्यांसाठी तयारी करत असलेले तरुण स्टेट बँक ऑफ इंडिया, एसबीआयद्वारे होणाऱ्या भरतीची आतुरतेने वाट पाहत असतात. उमेदवार या वर्षी देखील एसबीआय लिपिक भरती २०२२ आणि एसबीआय पीओ भरती २०२२ च्या जाहिरातीची वाट पाहत आहेत. भरती अधिसूचना दरवर्षी जानेवारी ते एप्रिल दरम्यान प्रसिद्ध केली जाते. या वर्षी देखील अधिसूचना एप्रिल महिन्यात प्रसिद्ध होईल अशी अपेक्षा आहे. माहितीनुसार, एसबीआय लिपिक भरती २०२२ आणि एसबीआय पीओ २०२२ ची जाहिरात लवकरच येणार आहे. तर एसबीआय लिपिक भरती प्राथमिक परीक्षा २०२२ जून-जुलै दरम्यान आयोजित केली जाण्याची शक्यता आहे. या पदांसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. पदवीचे अंतिम वर्ष/सेमिस्टरचे विद्यार्थी एसबीआय लिपिक भरती २०२२ साठी अर्ज करू शकतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एसबीआय परीक्षार्थी वय

एसबीआय लिपिक भरती २०२२ साठी उमेदवारांचे वय किमान २० वर्षे आणि कमाल २८ वर्षे असावे. तर एसबीआय पीओ भरती २०२२ साठी उमेदवारांचे वय किमान २१ वर्षे आणि कमाल ३१ वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार उच्च वयोमर्यादेत सूट मिळेल.

एसबीआय लिपिक परीक्षा
-प्राथमिक परीक्षा
-मुख्य परीक्षा
-स्थानिक भाषा चाचणी

एसबीआय पीओ परीक्षा
-प्राथमिक परीक्षा
-मुख्य परीक्षा
-मुलाखत

एसबीआय लिपिक पगार
बेसिक पे- १९,९००/- (१७,९००/- + पदवीधरांसाठी दोन अ‍ॅडव्हान्स इन्क्रीमेंट).

पे स्केल- १७,९००-१०००/३-२०९००-१२३०/३-२४,५९०-१४९०/४-३०,५५०-१७३०/७-४२६००-३२७०/१-४५,९३०-१९९०/१-४७,९२० रुपये

एसबीआय पीओ पगार
एसबीआय पीओचा पगार ४१,९६० रुपये प्रति महिना (मूलभूत वेतन) पासून सुरू होतो. प्रोबेशनरी अधिकारी/व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी यांची वेतनश्रेणी ३६,०००-१४९०/७-४६४३०-१७४०/२-४९९१०-१९९०/७-६३८४० आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sbi recruitment 2022 for clerk and po rmt