जनतेकडून निधी गोळा करण्यास सेबीने यूआरओ समूहासह आठ कंपन्यांना बंदी केली आहे. बेकायदेशीररीत्या पैसे गोळा करत असल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. त्याची लगेचच अंमलबजावणी केली जाईल.
या कंपन्यांखेरीज त्यांच्या संचालकांना रोखे बाजारात र्निबध घालण्यात आले आहेत. या कंपन्यांनी सुमारे ८ हजार गुंतवणूकदारांकडून १३० कोटी रुपये विमा सुरक्षेच्या नावाखाली गोळा केले. त्यामध्ये कंपनी कायद्याचे उल्लंघन झाल्याचे उघड झाल्याचा ठपका सेबीने ठेवला आहे. या कंपन्यांनी प्रत्येकी ५० जणांना समभाग दिले.
शेअर बाजारात या कंपन्यांची नोंदणी गरजेची असून, तसेच माहितीची देवाणघेवाण करणे आवश्यक आहे. ती त्यांनी केली नाही. तसेच त्यांनी गोळा केलेला निधी इतरत्र वळवू नये, असे निर्देश त्यांना सेबीने दिले आहेत. तसेच मालमत्ताविषयक सर्व तपशील देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कारवाई करण्यात आलेल्या कंपन्यांमध्ये गोल्डमाईन फूड प्रॉडक्ट, आदर्श वेल्स व्हेंचर्स, आस्था ग्रीन इनर्जी व्हेंचर्स इंडिया (ही कंपनी पूर्वी जेकेएआर इनर्जी व्हेंचर्स नावाने ओळखली जात होती) तसेच यूआरओ समूहातील यूआरओ वॉकर्स, यूआरओ इन्फ्रा रियालिटी इंडिया, यूआरओ इन्फोटेक, यूआरओ लाइफकेअर, यूआरओ हायजिनिक फूड्स यांचा समावेश आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sebi bars 8 firms from raising public funds