जागतिक स्तरावर प्रतिकूल बनत असलेल्या अर्थस्थितीतून स्थानिक भांडवली बाजाराच्या अस्वस्थतेने बुधवारी पुन्हा एकदा प्रत्यय दिला. परिणामी, दोन दिवसांच्या तेजीतून कमावलेले सर्व काही सेन्सेक्सने बुधवारच्या ३८२ अंशांच्या घसरगुंडीतून गमावले. २५,४८२.५२ या दोन महिन्यांपूर्वीच्या खालच्या स्तरावर सेन्सेक्सने पुन्हा फेर धरला.
बुधवारच्या व्यवहारात मोठय़ा प्रमाणात झालेल्या विक्रीचा सर्वाधिक फटका आघाडीच्या आयटी समभागांना बसला. दोन दिवसांच्या तेजीतून ७८०० ची पातळी पुन्हा कमावणाऱ्या, निफ्टी ५० निर्देशांकही १०५.७५ अंशांची घसरण दाखवून ७,७३१.८० या पातळीवर अवनत झाला. जागतिक अर्थस्थितीबाबतच्या चिंतेत प्रति डॉलर ६६.३० स्तरावरील रुपयाच्या तीव्र घसरणीचाही बाजाराने धसका घेतल्याचे आढळून आले.
संग्रहित लेख, दिनांक 19th Nov 2015 रोजी प्रकाशित
३८२ अंशांनी सेन्सेक्सची घसरण
बुधवारच्या व्यवहारात मोठय़ा प्रमाणात झालेल्या विक्रीचा सर्वाधिक फटका आघाडीच्या आयटी समभागांना बसला.
Written by मंदार गुरव
First published on: 19-11-2015 at 04:23 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex down 382 points