रिझव्र्ह बँकेच्या संभाव्य व्याजदर कपातीच्या जोरावर गेल्या दोन सत्रांत विक्रमी शिखरावर गेलेल्या मुंबई निर्देशांकाने शुक्रवारी आठवडय़ाची समाप्ती २४०.१० अंश घसरणीसह २१,१३३.५६ वर स्थिरावून केली. तर सर्वोच्च उच्चांकासमीप असलेला निफ्टी याच व्यवहारात ७८.९० अंशाने घसरत ६,२६६.७५ पर्यंत खाली आला. सेन्सेक्सने सलग दोन दिवस विक्रम सर करताना २१,४०० नजीक मजल मारली होती. रिझव्र्ह बँकेच्या ऊर्जित पटेल समतीच्या शिफारशींसह गव्हर्नर डॉ. राजन यांचे महागाई हीच चढे व्याजदर ठेवण्यास जबाबदार ठरत असल्याच्या विधानाने गुंतवणूकदारांनी शुक्रवारी मोठय़ा प्रमाणात समभाग विक्री केली. आजची घसरण ही २ जानेवारीनंतरची एकाच व्यवहारातील सर्वात मोठी घट ठरली. चीन, अमेरिका आदी जागतिक शेअर बाजारातील कुंद वातावरणाचा परिणामही स्थानिक भांडवली बाजारावर जाणवला. ज्यातून व्याजदराशी निगडित समभागांना घसरणीचा मोठा फटका शुक्रवारी बसला.
वधारलेले समभाग (बीएसई ए ग्रुप)
भारती इन्फ्राटेल लि. : “१७२.१० २.५०%
महिंद्र फायनान्स : “२४५.६५२.४०%
रॅनबॅक्सी लॅब : “३३६.५०१९.३३%
कॅनरा बँक : “२४७.८५६.६७%