देशात इंटरनेटपुरक मोबाइल फोन वापरणाऱ्यांच्या एकूण संख्येपैकी निम्म्याहून अधिक लोक इंटरनेट वापरत नसल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात समोर आले आहे. या मागची कारणे जाणून घेताना इंटरनेट वापराची भीती हे मुख्य कारण समोर आले आहे.
देशात मोबाइलधारकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या सर्वच फोन्समध्ये इंटरनेट वापरण्याची सुविधा आहे. पण बहुतांश लोक इंटरनेट वापरणे कठीण असते या मानसिकतेमुळे त्यातील इंटरनेटचा वापरच करत नसल्याचे समोर आले आहे. यामध्ये वृद्ध, गृहीणी अशांचा अधिक समावेश आहे. तर काहींना इंटरनेटचे दर खूप जास्त आहेत म्हणून ते वापरणे सोयीस्कर वाटत नाही. शहरात मोबाइलवर इंटरनेट वापरणाऱ्यांचया संख्येत सातत्याने वाढ होत असली तरी ग्रामीण भागात मात्र ती म्हणावी इतकी नसल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. अशा मोबाइलधारकांना इंटरनेटकडे वळविण्यासाठी मोबाइल नेटवर्क पुरविणाऱ्या कंपन्यांकडून सातत्याने वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. यामध्ये एअरटेलने ‘वन टच इंटरनेट’ सुविधा सुरू केली आहे. यामध्ये प्रीपेड ग्राहकांना आपल्या मोबाइलवर इंटरनेट कसे वापरायचे याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. उदाहणार्थ मोबाइलवर फेसबुक कसे वापरायचे याबाबत साक्षर करणारा एक व्हिडीओ आपल्याला यामध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. असाच व्हिडीओ ट्विटरसाठीही देण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही सुविधा मोफत असून यासाठी विशिष्ठ मर्यादेपर्यंत एकही पैसा खर्च होणार नाही. ही सुविधा वापरण्यासाठी मोबाइलमधील ब्राऊजर सुरू करून त्यात ‘ल्ली.ं्र१३ी’.्रल्ल’ असे टाईप करावे.
ही सुविधा शुक्रवारपासून सुरू होणार असून सध्या इंग्रजी आणि हिंदी भाषेत उपलब्ध होणार आहे. लवकरच मराठीसह सहा भाषांमध्ये सुविधा उपलब्ध होणार आहे. ‘वनटच इंटरनेट’च्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत तंत्रज्ञान नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रथमच इंटरनेट वापरणाऱ्यांसाठी ही सुविधा खूप उपयुक्त ठरणार असल्याचे भारती एअरटेलचे मुंबई, महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात हबचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक गणपती यांनी स्पष्ट केले.
‘वन टच’ उपाय
वन टच इंटरनेट सुविधेमध्ये फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटरचे १० ट्रायल्स, युटय़ूबसाठी २० मिनिटे, एअरटेलच्या विंक या गाणी डाऊनलोड करण्याच्या अॅपमधून २५ गाणी मोफत डाऊनलोडिंग, ई-कॉमर्स, ट्रॅव्हल्स संकेतस्थळासाठी दिवसाला पाच एमबीपर्यंत ब्राऊझिंग आदी सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत. याशिवाय यामध्ये ‘आणखी शिका’ असा पर्याय देण्यात आला आहे. यामध्ये इंटरनेटच्या वापरापासून ते त्यातील काही संज्ञांची माहितीही देण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 7th Nov 2014 रोजी प्रकाशित
स्मार्टफोनधारक, पण इंटरनेट वापरण्याची भीती
देशात इंटरनेटपुरक मोबाइल फोन वापरणाऱ्यांच्या एकूण संख्येपैकी निम्म्याहून अधिक लोक इंटरनेट वापरत नसल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात समोर आले आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 07-11-2014 at 03:29 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smartphone internet