International Women’s Day : दरवर्षी ८ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. यावेळी महिला दिनानिमित्त तुम्ही आपल्या पत्नीला काही भेट देण्याचा विचार करत असाल तर त्यांच्या नावावर गुंतवणूक करणे एक चांगला पर्याय ठरू शकतो. तथापि, अशा गुंतवणुकीतून मिळणार्‍या उत्पन्नावर कर कसा आकारला जातो याची माहिती तुम्हाला असली पाहिजे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कर नियम सांगतात की पतीने पत्नीच्या नावावर केलेली कोणतीही गुंतवणूक ही भेट म्हणून गणली जाईल. नांगिया अँडरसन इंडियाचे संचालक चिराग नांगिया यांच्या मते, पत्नीने इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) फॉर्मच्या शेड्यूल EI मध्ये गुंतवणुकीची रक्कम सवलत मिळकत म्हणून उघड केली पाहिजे. उदाहरणार्थ, जर पतीने पत्नीच्या नावावर ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) मध्ये गुंतवणूक केली असेल, तर व्याज उत्पन्न त्याच्या एकूण उत्पन्नात आयटीआरच्या शेड्यूल एसपीआयमध्ये जोडले जाईल. तथापि, नांगिया यांच्या म्हणण्यानुसार, पत्नीला यापद्धतीने जमा केलेले उत्पन्न जाहीर करणे आवश्यक नाही.

International Women’s Day 2022 : तुमच्या आयुष्यातील महत्वाच्या महिलांना द्या ‘या’ खास भेटवस्तू

नातेवाईकांकडून मिळालेल्या रोख भेटवस्तूंवर कर

आयकर नियमांनुसार, नातेवाईकांकडून मिळालेल्या रोख भेटवस्तू पूर्णपणे करमुक्त असतात. यामध्ये म्हटले आहे की पती आणि पत्नी तसेच त्यांचे कोणतेही वंशपरंपरागत नातेवाईक, नातेवाईकांच्या कक्षेत येतात.

इतरांकडून मिळालेल्या रोख भेटवस्तूंवर कर

प्राप्तिकर कायदा, १९६१ च्या कलम ५६(२)(x) नुसार, एखाद्या व्यक्तीला आर्थिक वर्षात कोणत्याही मोबदल्याशिवाय मिळालेली एकूण संपत्ती ५० हजार रुपयांपेक्षा जास्त असल्यास, त्यावर कर भरावा लागेल. अशा रकमेवर “इतर स्त्रोतांकडून मिळणारे उत्पन्न” म्हणून कर आकारला जातो.

आरएसएम इंडियाचे संस्थापक डॉ. सुरेश सुराणा यांच्या मते, एका आर्थिक वर्षात एक किंवा अधिक लोकांकडून मिळालेली एकूण रोख रक्कम ५० हजार रुपयांपेक्षा जास्त असल्यास, अशा रकमेवर लागू स्लॅब दरानुसार कर आकारला जाईल. त्यामुळे, कर टाळण्यासाठी, एका आर्थिक वर्षात मिळालेल्या भेटवस्तूंची एकूण रक्कम ५० हजार रुपयांपेक्षा जास्त नसावी.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thinking of investing in wife name find out how the tax is levied on it pvp