scorecardresearch

International Women’s Day 2022 : तुमच्या आयुष्यातील महत्वाच्या महिलांना द्या ‘या’ खास भेटवस्तू

आज आपण जाणून घेऊया, आंतरराष्ट्रीय महिला दिनी तुम्ही तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या महिलांना कोणती भेट देऊ शकता?

आंतरराष्ट्रीय महिला दिन २०२२ साठी भेटवस्तू कल्पना (Photo : Pixabay)

महिलांच्या अधिकारांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी ‘आंतरराष्ट्रीय महिला दिवस’ म्हणजेच ‘इंटरनॅशनल वूमन्स डे’ साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त दरवर्षी एक संकल्पना ठरवली जाते. यंदा ‘शाश्वत उद्यासाठी आज लैंगिक समानता आवश्यक’ अशी संकल्पना ठरवण्यात आली आहे.

या खास प्रसंगी महिलांना सन्मान देणे, त्यांना यशस्वी होण्यासाठी प्रेरणा देणे, त्यांच्याप्रती आभार व्यक्त करणे आणि जीवनातील त्यांचे महत्त्व समजून घेऊन त्यांचे कौतुकही केले जाते. या दिवशी तुम्ही तुमच्या आई, बहीण, मैत्रिणी, पत्नी किंवा सहकर्मचारी यांसारख्या तुमच्या आयुष्यात उपस्थित असलेल्या खास महिलांना धन्यवाद म्हणून भेटवस्तूही देऊ शकता. आज आपण जाणून घेऊया, आंतरराष्ट्रीय महिला दिनी तुम्ही तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या महिलांना कोणती भेट देऊ शकता?

Women’s Day 2022: पत्नीच्या नावाने गुंतवणूक करण्याचा विचार करताय? जाणून घ्या यावर कशापद्दतीने आकारला जातो कर

आंतरराष्ट्रीय महिला दिन २०२२ साठी भेटवस्तू कल्पना (Gift ideas for International Women’s Day 2022)

 • या खास प्रसंगी, तुम्ही हाताने तयार केलेले किंवा बाजारातून खरेदी केलेले ग्रीटिंग कार्ड देऊन त्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देऊ शकता.
 • तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही त्यांना एक छानशी पर्स भेट देऊ शकता.
 • या भेट म्हणून दिवशी डायरी आणि पेनही देता येईल.
 • त्यांची आवड तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही त्यांना ड्रेसही गिफ्ट करू शकता.
 • ज्या महिलांना अभ्यासाची किंवा वाचनाची आवड आहे त्यांच्यासाठी भेट म्हणून पुस्तकांपेक्षा चांगला पर्याय असूच शकत नाही.
 • तुम्ही त्यांच्या चित्रांचा कोलाज बनवू शकता आणि त्यांच्या प्रतिभेची प्रशंसा करणारी एक नोट लिहू शकता.
 • तुम्ही त्यांच्यासाठी त्यांची आवडती डिश ऑर्डर करू शकता.
 • आपण भेटवस्तू खरेदी करू शकत नसल्यास, ऑनलाइन व्हिडिओ बनवून त्यांची प्रशंसा करू शकता.
 • त्यांना ब्रेसलेट किंवा हार देखील दिला जाऊ शकतो.
 • जर त्यांना फिटनेसची आवड असेल तर तुम्ही त्याला नवीन योगा मॅट, हेल्थ बँड इ. भेट देऊ शकता.
 • जर त्यांना स्वयंपाकाची आवड असेल तर तुम्ही त्यांना स्वयंपाकघराशी संबंधित वस्तूही भेट देऊ शकता.
 • जर ते निसर्ग प्रेमी असतील तर तुम्ही त्यांना एखादी वनस्पती भेट म्हणून द्या.

भेटवस्तू काहीही असो, त्यांना पुढे जाण्यासाठी नक्कीच प्रेरणा द्या आणि त्यांचे आभार मानायला विसरू नका.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Give these special gifts to important women in your life pvp