सामान्य विमा क्षेत्रातील व्यवसायास तब्बल नऊ महिन्यानंतर व्हिडिओकॉन समूहाने अखेर सुरुवात केली आहे. अमेरिकेच्या लिबर्टीबरोबर भागीदारी करत या व्यवसायाचा परवाना समूहाला गेल्या मे २०१२ मध्ये मिळाला होता. यामध्ये लिबर्टीचा हिस्सा २६ टक्के आहे. व्हिडिओकॉन हा समूह ९ अब्ज डॉलरचा असून लिबर्टी म्युच्युअल इन्शुरन्स समूह जगातील सहावी मोठी विमा कंपनी आहे. भारतीय विमा व्यवसायात यामार्फत २७ व्या कंपनीचा शिरकाव झाला आहे. वार्षिक १५ टक्क्यांनी वाढणारा भारतीय सर्वसाधारण विमा उद्योग २०२० पर्यंत ५० अब्ज डॉलरचा होण्याचा अंदाज आहे. लिबर्टी व्हिडिओकॉन जनरल इन्शुरन्स नावाने हा व्यवसायास सुरू होत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 26th Feb 2013 रोजी प्रकाशित
विमा व्यवसायातही ‘व्हिडिओकॉन’ नाममुद्रा
सामान्य विमा क्षेत्रातील व्यवसायास तब्बल नऊ महिन्यानंतर व्हिडिओकॉन समूहाने अखेर सुरुवात केली आहे. अमेरिकेच्या लिबर्टीबरोबर भागीदारी करत या व्यवसायाचा परवाना समूहाला गेल्या मे २०१२ मध्ये मिळाला होता. यामध्ये लिबर्टीचा हिस्सा २६ टक्के आहे.
First published on: 26-02-2013 at 12:38 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Videocon in insurance sector