Withdrawal of Indexes Global market weakness Mumbai Stock Exchange ysh 95 | Loksatta

निर्देशांकांची माघार

जागतिक बाजारातील कमकुवत प्रवाहाला अनुसरत, गुरुवारी स्थानिक बाजारात गेल्या सलग दोन सत्रांत नवीन शिखरस्थानी झेप घेणाऱ्या निर्देशांकांनी उसंत घेत माघार दर्शविली.

निर्देशांकांची माघार
संग्रहित छायाचित्र

मुंबई : जागतिक बाजारातील कमकुवत प्रवाहाला अनुसरत, गुरुवारी स्थानिक बाजारात गेल्या सलग दोन सत्रांत नवीन शिखरस्थानी झेप घेणाऱ्या निर्देशांकांनी उसंत घेत माघार दर्शविली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २३०.१२ अंशांनी (०.३७ टक्के) घसरून ६१,७५०.६० वर स्थिरावला. दिवसभरात तो ३३७.४५ अंशांनी घसरून ६१,६४३.२७ वर गडगडला होता. बुधवारी सेन्सेक्सने ६२ हजारांपुढील पातळीला गवसणी घालून, ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर बंद नोंदविला होता. दुसरीकडे निफ्टी निर्देशांक ६५.७५ अंशांनी (०.३६ टक्के) घसरून १८,३४३.९० वर विश्राम घेतला.

आशियात इतरत्र प्रमुख बाजार घसरणीसह बंद झाले. दुपारच्या सत्रात युरोपातील बहुतेक भांडवली बाजारात घसरणीसह व्यवहार सुरू होते, तर बुधवारी अमेरिकेतील बाजाराने नकारात्मक कल दर्शविला होता. त्या परिणामी सत्रारंभापासूनच, स्थानिक बाजारात नरमाईचे वातावरण होते.  गुरुवारी ब्रेंट क्रूड ०.४६ टक्क्यांनी घसरून पिंपामागे ९२.४३ डॉलरवर व्यापार करत होते. तर रुपयाही डॉलरमागे तब्बल ३८ पैशांनी गडगडला.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-11-2022 at 01:23 IST
Next Story
दिवाळखोरी प्रक्रियेद्वारे बँकांकडून थकबाकीच्या ३१ टक्क्यांचीच वसुली