या सदरासाठी येणाऱ्या बहुसंख्य ई-मेल या गुंतवणूकसंबंधित विचारणा करणाऱ्या असतात. परंतु आíथक नियोजन हे कुटुंबाच्या र्सवकष आíथक गरजा पाहून करायचे असते. गुंतवणूकविषयक एखादा निर्णय चुकला तरी परताव्याच्या दरात दोन-पाच टक्क्यांपेक्षा कमी फरक येईल. परंतु या कुटुंबाच्या नियोजनात राजेश्री व सचिन यांचे अपुरे विमा छत्र व सुरेश आणि शोभा यांना पुरेसा आरोग्य विमा असणे या दोन गरजा प्रामुख्याने लक्षात घेण्यात आल्या आहेत. परंपरेने आढळणारी गोष्ट या कुटुंबातही दिसते. ती म्हणजे राजेश्री व सचिन या दोघांचे उत्पन्न सारखेच असूनही सचिन यांचे विमाछत्र राजेश्री यांच्यापेक्षा जवळजवळ तिप्पट आहे. साहजिकच सर्व प्रथम राजेश्री व सचिन हे दोघेही कमावते असल्याने दोघांनाही पुरेसे विमाछत्र असणे गरजेचे आहे. एलआयसी, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ, एसबीआय लाइफ व एचडीएफसी लाइफ या अव्वल ‘क्लेम सेटलमेंट रेशो’ असलेल्या विमा कंपन्या आहेत. या पकी कोणत्याही विमा कंपनीचा ५० लाखांचे विमा छत्र असलेला व ३० वष्रे मुदतीचा विमा दोघांनी घेणे गरजेचे आहे. दोघांचीही भविष्यात कौटुंबिक जबाबदारी वाढत जाणार असल्याने पुढील पाच वर्षांनी त्यांनी आपले विमाछत्र दुप्पट करायचे आहे. पहिली ५० लाखांची योजना एलआयसीची ‘ई-टर्म’ तर भविष्यात नियोजन केलेली ५० लाखाची पॉलिसी खासगी कंपनीची घेऊन समतोल साधावा. राजेश्री व सचिन मिळून दोघांना ६ लाखांचा आरोग्य विमा आहे. जो आजच्या तारखेला पुरेसा आहे. परंतु सुरेश व शोभा यांना केवळ ३ लाखांच्या आरोग्य विम्याचे छत्र अपुरे आहे. सुरेश गावकर हे महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त कर्मचारी असल्याने त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याकरिता असलेल्या न्यू इंडिया एश्युरन्स कंपनीचा ‘सेवा स्वास्थ’ या समूह आरोग्य विमा योजनेचे सभासद व्हावे.
राजेश्री व सचिन या दोघांकडे शिल्लक असलेल्या मासिक ४० हजार शिलकीपकी अंदाजे २,००० रुपये मुदतीच्या विम्याचा हप्ता भरण्यात जाईल. उर्वरित रकमेचे पुढीलप्रमाणे नियोजन असावे. दोघांचे वय लक्षात घेऊन एकूण बचतीच्या ३० टक्के रक्कम निश्चित परतावा देणाऱ्या गुंतवणूक प्रकारात होणे गरजेचे आहे. दोघांनी पीपीएफ खाते उघडून दरमहा प्रत्येकी ५,००० रुपये या खात्यात जमा करावी. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत जमा होत असलेली रक्कम व विद्यमान सुरू असलेल्या जीवन विमा योजना अधिक पीपीएफ खात्यात जमा करण्यास सुचविलेली रक्कम मिळून एकूण बचतीच्या ३० टक्के रक्कम निश्चित परतावा देणाऱ्या गुंतवणूक प्रकारात होत आहे.
राजेश्री यांनी त्यांची गुंतवणूक सध्या सचिन यांच्या बँकेत मुदत ठेवीच्या रूपात केली आहे, तर सचिन हे आपली गुंतवणूक मुदत ठेवी व एसआयपीद्वारे तीन म्युच्युअल फंडात करत आहेत. अकस्मात उद्भवणाऱ्या तातडीच्या खर्चासाठीची तरतूद मुदत ठेवींच्या रूपात करावी. राजेश्री यांना सर्वच गुंतवणूक निश्चित परतावा देणाऱ्या गुंतवणूक प्रकारात हवी आहे. म्हणून त्यांनी आपल्या (सचिन यांच्या बँकेतील) गुंतवणूक सल्लगारामार्फत शक्य असेल तेव्हा प्रत्यक्ष रोखे व रोखे गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडात करावी. सचिन यांच्या सुरू असलेल्या एचडीएफसी इक्विटी, आयसीआयसीआय फोकस्ड ब्लू चीप व एसबीआय ब्लू चीप या तिन्ही योजना लार्ज कॅप प्रकारात मोडणाऱ्या अव्वल योजना आहेत. सचिन यांनी अधिकचे ५,००० (एकूण १० हजार) रुपये सध्या सुरू असलेल्याच म्युच्युअल फंडाच्या योजनांत गुंतवावे. उर्वरित ५,००० ‘लोकसत्ताकत्रे म्युच्युअल फंडा’च्या यादीतून दोन मिड कॅप फंड प्रकारातील म्युच्युअल फंडाची निवड करावी.
आयुर्वम्यिाच्या विद्यमान योजना बंद कराव्या का, असा प्रश्न राजेश्री व सचिन यांनी विचारला आहे. एकदा विकत घेतलेल्या आयुर्वम्यिाच्या योजना बंद करणे म्हणजे भरलेले हप्ते फुकट घालविणे होय. हे हप्ते परत मिळत नाहीत. आजच्या घडीला आयुर्वम्यिावर चार-साडेचार टक्के इतकाच परतावा मिळत आहे. राजेश्री व सचिन यांनी या योजना बंद (सरेंडर) करावयाचे ठरविल्यास भरलेल्या एकूण हप्त्यापकी साधारण ३० टक्केच रक्कम परत मिळेल. राजेश्री व सचिन यांच्याकडील रोकड सुलभता पाहता या योजना घेण्यात चूक झाली, असे वाटले तरीही या गोष्टींचा विचार करून या योजनांचे हप्ते भरणे थांबवावे किंवा कसे याचा निर्णय करावा. परंतु भविष्यात विमा विक्रेत्याने कितीही आग्रह केला तरी कोणतीही मनी बॅक किंवा एंडोमेंट प्रकारची योजना घेणार नाही, हा निश्चय करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
संग्रहित लेख, दिनांक 16th Mar 2015 रोजी प्रकाशित
चुका पारंपरिकच.. टाळता येण्यासारख्या!
एकदा विकत घेतलेल्या आयुर्वम्यिाच्या योजना बंद करणे म्हणजे भरलेले हप्ते जवळपास फुकट घालविणेच होय. आजच्या घडीला आयुर्वम्यिावर चार-साडेचार टक्केइतकाच परतावा मिळत आहे.

First published on: 16-03-2015 at 01:06 IST
TOPICSनियोजन भान
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Life insurance existing scheme to be closed