मागील लेखात लिहिल्याप्रमाणे ‘शिवामूठचा सिक्वेल’ सुरू करण्याविषयी साशंकता होती. ‘लोकसत्ता’च्या नेहमीच्या वाचकांपकी संगमनेरचे अतुल कोटकर यांनी ‘शिवामूठचे प्रगतिपुस्तक’ पाठविले. त्यामुळे कुठलीही सबब न सांगता चार भागांची मालिका सुरू केली. अतुल हे ‘अर्थ वृत्तांत’मधील अनेक गोष्टी नोंदून ठेवत असतात व योग्य वेळी पोतडीतून काढूनही देतात. त्यांच्यासारखे वाचक लिहिण्याचा उत्साह टिकवून ठेवतात, त्याबद्दल त्यांचे आभार.
ल्ल बायोकॉन लिमिटेड
किरण मुझुमदार-शॉ या प्रवर्तक असलेल्या बायोकॉन कंपनीची कथा अतिशय रंजक आहे. ज्या कंपनीला कोणतीही बँक व्यवसाय सुरू करण्यास कर्ज देण्यास राजी नव्हती, त्या कंपनीच्या प्राथमिक भाग विक्रीच्या पहिल्या दिवशीच एकूण मागणी नोंदविलेल्या शेअरचे मूल्य १०० दशलक्ष डॉलर होते व सूचिबद्ध झाल्यावर पहिल्याच दिवशी या कंपनीचे बाजारमूल्य १.११ अब्ज डॉलर होते. बायोकॉन ही भारतातली सर्वात मोठी जैवतंत्रज्ञान कंपनी आहे. ही कंपनी मुख्यत्वे कर्करोग, मधुमेह या व्याधींवर संशोधन करून उपाय करणारी औषधे तयार करते. या कंपनीची स्थापना २९ नोव्हेंबर १९७८ ला झाली. सुरुवातीच्या काळात कंपनी पपईतून एन्झिन काढून त्याची विक्री करीत असे. पुढील काळात कंपनी विकसित होताना नवीन उत्पादने, संशोधन प्रकल्प यावर कंपनीने लक्ष केंद्रित केले. आज ही कंपनी तिच्या संशोधनासाठी जगात ओळखली जाते. कंपनीने आपला व्यवसाय पाच उपगटात विभागला आहे. कंपनीचा मोठा महसूल आपली उत्पादने अमेरिका व युरोपच्या बाजारात उत्पादने विकून मिळतो. २००५-२०१० या काळात कंपनीने वेगवेगळ्या औषधांसाठी वेगवेगळ्या औषध नियंत्रकांकडून मोठय़ा संख्येने औषध विक्रीचे परवाने मिळवले. कंपनीने तिमाही निकालांच्या वेळी दिलेल्या माहितीनुसार दोन वर्षांच्या वैद्यकीय चाचणीनंतर दोन नवीन औषधे चालू तिमाहीत विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. त्यापकी एक सोरायसिस या त्वचेच्या विकाराच्या इलाजासाठी वापरले जाणारे औषध मागील आठवडय़ात विक्रीसाठी उपलब्ध झाले. भारतातील १.७५-२% लोकसंख्या या विकाराला बळी पडली असून सध्या फायझर व जॉन्सन अॅण्ड जॉन्सन या बहुराष्ट्रीय कंपन्यांची औषधे इलाज करण्यासाठी वापरली जातात. या औषधांच्या निम्म्या किमतीत बायोकॉनचे औषधे उपलब्ध झाले आहे. अल्झायमर विकारावरच्या औषधाची चाचणी ‘इयु फेज-३’च्या शेवटच्या टप्प्यात असून हे औषध पुढील वर्षीच्या पहिल्या तिमाहीत युरोपच्या बाजारपेठेत उपलब्ध करून देण्यात येईल. सध्या शेअरचा भाव २०१४ च्या प्रति समभाग मिळकतीच्या १३ पट आहे. तर २०१५ च्या नऊपट आहे. आज मागील वर्षभरातील उच्चांकाच्या जवळ असलेला भाव एका वर्षांनंतर भाव ४२५-४५० दरम्यान असेल असा अंदाज आहे. लुपिन, सन फार्मा, डॉ. रेड्डीज् या भारतीय औषध निर्मात्यांच्या तुलनेत बायोकॉनचे वाजवी मूल्यांकन हेच या कंपनीचे शेअर खरेदीची शिफारस करण्यामागील हेतू आहे. ३० ऑगस्टपासून ही कंपनी ठ्रऋ३८ ट्रूिंस्र् 50 या निर्देशांकात समावेश होणार आहे. या निर्देशांकात नव्याने समाविष्ट होणाऱ्या कंपन्यांचे बाजारमूल्य १,००० ते ५,००० कोटी रुपयांच्या दरम्यान असावे लागते.
बायोकॉन लिमिटेड
सद्य बाजारभाव रु. ३३७.१५
दर्शनी मूल्य रु. १०
वर्षांतील उच्चांक/नीचांक रु. ३५२/ रु. २४१