2 November Horoscope Rajyog: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी आपल्या स्वतःच्या राशीत किंवा उच्च राशीत प्रवेश करतात, तेव्हा ते राजयोग आणि शुभ योग तयार करतात. आज आपण शुक्र ग्रहामुळे तयार होणाऱ्या राजयोगाबद्दल जाणून घेणार आहोत.

२ नोव्हेंबर रोजी शुक्र ग्रह आपल्या स्वराशी म्हणजेच तूळ राशीत प्रवेश करणार आहेत. या प्रवेशामुळे मालव्य राजयोग तयार होणार आहे. या योगामुळे काही राशींचे नशीब उजळू शकते. तसेच या लोकांना करिअर आणि व्यवसायात प्रगती मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊ या, या लकी राशी कोणत्या आहेत…

वृषभ राशी (Taurus Horoscope)

तुमच्यासाठी मालव्य राजयोग फायदेशीर ठरू शकतो. कारण शुक्र ग्रह तुमच्या राशीपासून सप्तम भावात भ्रमण करत आहेत. त्यामुळे या काळात तुमचा व्यक्तिमत्त्व आकर्षक राहील. विवाहित लोकांचा जीवनसाथीसोबत चांगला संवाद आणि समजूतदारपणा राहील. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी नवी जबाबदारी मिळू शकते. तसेच अविवाहितांना विवाहाचा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही एखादी लक्झरी वस्तूही खरेदी करू शकता.

धनु राशी (Sagittarius Horoscope)

मालव्य राजयोग धनु राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरू शकतो. कारण शुक्र ग्रह तुमच्या राशीपासून ११व्या भावात भ्रमण करणार आहेत. त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होऊ शकते. नोकरीच्या कारणाने तुम्हाला काही प्रवास करावे लागू शकतात आणि हे प्रवास फायद्याचे ठरतील. गुंतवणूक किंवा मालमत्तेशी संबंधित काही लाभ मिळू शकतो. मित्र आणि वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. कुटुंबात एखादी आनंदाची बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे मन प्रसन्न राहील. तसेच तुम्हाला शेअर बाजार, सट्टा किंवा लॉटरीतही फायदा होण्याची शक्यता आहे.

तूळ राशी (Libra Horoscope)

मालव्य राजयोग तयार झाल्याने तूळ राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कारण हा राजयोग तुमच्या राशीपासून लग्न भावात तयार होत आहे. त्यामुळे या काळात विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि जीवनसाथीसोबत चांगले संबंध टिकतील. नवीन नोकरी, वाहन किंवा मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगले राहील आणि मनात नवीन उत्साह निर्माण होईल. जीवनात स्थैर्य आणि मान-सन्मान वाढेल. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होण्याचे योग आहेत. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांशी चांगला संवाद आणि ताळमेळ राहील. तसेच अविवाहितांना विवाहाचा प्रस्ताव येऊ शकतो.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)