2026 Horoscope Shani Effects in Zodiac Signs: ज्योतिषशास्त्रात न्यायाधीश शनीला खूप महत्त्वाचा ग्रह मानले जाते. शनी हा सगळ्यात हळू चालणारा ग्रह आहे आणि तो प्रत्येक राशीत साधारणपणे अडीच वर्ष राहतो. त्यामुळे शनीचा प्रभाव कोणत्याही राशीवर बराच काळ टिकून राहतो.

शनी वेळोवेळी नक्षत्र बदलत असतो, आणि त्या बदलाचा परिणाम सर्व १२ राशींवर चांगला किंवा वाईट होऊ शकतो. शनी एक नक्षत्रात जवळजवळ एक वर्ष राहतो, त्यामुळे पुन्हा त्या नक्षत्रात येण्यासाठी त्याला सुमारे २७ वर्ष लागतात.

सध्या शनी स्वतःच्या उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात आहे. येत्या २०२६ च्या जानेवारी महिन्यात शनी उत्तरा भाद्रपदा नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात प्रवेश करेल. या बदलामुळे काही राशीच्या लोकांना विशेष फायदा मिळू शकतो. चला तर मग पाहूया, कोणत्या भाग्यवान राशींना या बदलाचा लाभ मिळणार आहे.

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, कर्माचे फळ देणारा शनी २० जानेवारीला दुपारी १२ वाजून १३ मिनिटांनी उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या पहिल्या चरणात प्रवेश करेल आणि २२ फेब्रुवारीपर्यंत त्याच चरणात राहील. त्यानंतर तो दुसऱ्या चरणात प्रवेश करेल. या नक्षत्र बदलाच्या काळात शनी गुरुच्या मीन राशीत स्थित असेल.

वृषभ राशी (Taurus Horoscope)

या राशीच्या लोकांसाठी शनीचा उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या पहिल्या चरणात प्रवेश खूप खास ठरू शकतो. शनी या काळात या राशीच्या एकादश भावात राहील. त्यामुळे या राशीच्या लोकांची बरीच काळापासून थांबलेली एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते. कुटुंबासोबत आनंदाचा वेळ घालवता येईल. कामात येणाऱ्या अडचणी दूर होऊ शकतात आणि आपल्या योजना यशस्वी होतील.

धैर्य आणि पराक्रमात वाढ होईल, ज्यामुळे यशाचे दरवाजे उघडतील. कामाच्या ठिकाणीही चांगला काळ राहील. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल आणि त्यामुळे बऱ्याच काळापासून थांबलेली कामे पूर्ण होतील. बॉससोबत चांगले संबंध राहतील. नवीन नोकरी शोधत असलेल्यांना चांगला फायदा होऊ शकतो. पदोन्नती आणि पगारवाढ होण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही याचा मोठा लाभ मिळू शकतो.

मिथुन राशी (Gemini Horoscope)

या राशीच्या लोकांसाठी नवं वर्ष खूप चांगलं ठरू शकतं. या राशीत शनी उत्तराभाद्रपदा नक्षत्रात प्रवेश करून दशम भावात राहणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी हा नक्षत्र बदल खूप महत्त्वाचा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरेल.

तुम्ही एखाद्या कामासाठी बऱ्याच काळापासून घेत असलेली मेहनत आता फळ देऊ शकते. तुमच्या कामात सुधारणा होईल आणि तुम्ही चांगले यश मिळवू शकाल. तुमची स्थिती मजबूत होऊ शकते. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध तयार होतील. अनावश्यक खर्चांपासूनही सुटका होईल. जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल. कुटुंबात चालू असलेले तणाव आणि चढउतार कमी होऊन शांतता येईल.

मीन राशी (Pisces Horoscope)

या राशीच्या लग्न भावात शनी राहणार आहे. त्यामुळे शनीचा उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या पहिल्या चरणात प्रवेश या राशीसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या लोकांची बरीच काळापासून थांबलेली कामे पूर्ण होऊ शकतात आणि धन-समृद्धीत वाढ होऊ शकते. कुटुंबासोबत आनंदाचा वेळ घालवता येईल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला ठरेल. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना चांगला फायदा मिळू शकतो.

तुम्ही आपल्या जुन्या चुका लक्षात घेऊन त्यातून बरेच काही शिकू शकता. चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी बऱ्याच काळापासून येणाऱ्या अडचणी दूर होऊ शकतात. वैवाहिक जीवनात काही चढउतार असूनही प्रेम कायम राहील. तुम्हाला अनेक क्षेत्रांत यश मिळू शकते. भावंडांसोबत चांगला वेळ जाईल. परदेश जाण्याची संधी मिळू शकते. तसेच जे लोक परदेशातून परत देशात यायचा विचार करत आहेत, त्यांनाही संधी मिळू शकते.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)