21st August Panchang & Rashi Bhavishya : २१ ऑगस्ट २०२४ रोजी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षाची द्वितीया तिथी आहे. द्वितीया तिथी संध्याकाळी ५ वाजून ०७ मिनिटांपर्यंत असेल. आज बुधवारी सुकर्मा योग संध्याकाळी ५ वाजून १ मिनिटांपर्यंत असेल. तसेच पूर्वाभाद्रपद नक्षत्र रात्री १२ वाजून ३४ मिनिटांपर्यंत राहील. राहू काळ दुपारी १२ वाजता सुरु होईल ते १ वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल. तर आज बुधवारी १२ राशींचा दिवस हसत खेळत जाणार की धावपळीचा हे आपण जाणून घेऊ या…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२१ ऑगस्ट पंचांग व राशीभविष्य :

मेष:- आळस झटकून कामाला लागा. योजना यशस्वी झाल्याचा आनंद मिळेल. लांबणीवर पडलेली कामे पूर्ण होतील. प्रवासातून लाभ संभवतो. सहकार्‍यांशी मतभेदाची शक्यता.

वृषभ:- आवडीचे पदार्थ खाल. आर्थिक योजना पूर्ण होतील. दिवस मध्यम फलदायी राहील. गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

मिथुन:- फसवणुकीपासून सावध रहा. धरसोड वृत्ती कमी करावी. एखादी घटना मन खिन्न करू शकते. चांगल्या कामाचे पुण्य पदरात पडेल. दिवसभर कामाची धांदल राहील.

कर्क:- दिवसाचा बहुतांश वेळ मजेत जाईल. ग्रहांची अनुकूल स्थिती लाभदायक ठरेल. हातातील कामे विनासायास पूर्ण होतील. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. थकवा दूर होईल.

सिंह:- साधे आणि सरळ जीवन मार्गक्रमीत कराल. सतत आशावादी राहावे. महत्त्वाच्या कामाच्या नोंदी तपासून पहाव्यात. नियोजित कामे पूर्णत्वास जातील. संमिश्र घटनांचा दिवस.

कन्या:- दुसर्‍यांच्या उपयोगी याल. लोक तुमचा सल्ला विचारात घेतील. मुलांकडून शुभ वार्ता मिळेल. दूरच्या नातेवाईकांची खुशाली समजेल. जुन्या मित्रांच्या भेटीचा योग येईल.

तूळ:- तुमच्या बोलण्याचा चांगला प्रभाव पडेल. आत्मविश्वास वाढीस लागेल. लोक तुमच्याकडे प्रभावित होतील. झोपेची तक्रार जाणवेल. नातेवाईकांमध्ये सलोखा जपावा.

वृश्चिक:- उगाच चिडचिड करू नये. संयमी भूमिका घ्यावी. मुलांसोबत दंगामस्ती कराल. करमणुकीत अधिक वेळ घालवाल. कामाच्या बाबतीत सतर्क राहावे.

धनू:- आज ग्रहमानाची अनुकूलता लाभेल. सरकारी कामे अधिक वेळ खातील. नवीन मित्र जोडले जातील. तरुणांच्यात सामील व्हाल. एखादा चांगला अनुभव गाठीशी बांधाल.

मकर:- जुन्या गोष्टींची खिन्नता बाळगू नका. जवळचा प्रवास कराल. कौटुंबिक मतभेद टाळावेत. कामाचे नवीन धोरण ठरवावे. काटकसरीपणा अंगी बाळगावा.

कुंभ:- आवडी-निवडी बाबत दक्ष राहाल. जोडीदाराचा हट्ट पुरा कराल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. भागिदारीतून लाभ मिळेल. मनाची चंचलता जाणवेल.

मीन:- दिवस मनाप्रमाणे घालवाल. आवडत्या गोष्टी करण्याकडे कल राहील. बोलतांना शब्दांचे वजन लक्षात घ्या. आजचा दिवस उत्तम फलदायी राहील. गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडून येतील.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 21st august 2024 rashi bhavishya krishna paksha dvitiya tithi in shravan will get mesh to mean zodiac signs happiness daily horoscope in marathi asp