Daily Horoscope : २३ फेब्रुवारी २०२५ रोजी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील दशमी तिथी आहे. दशमी तिथी १ वाजून ५५ मिनिटांपर्यंत चालेल. मूळ नक्षत्र ६ वाजून ४१ मिनिटांपर्यंत जागृत असणार आहे. तर आज वज्र योग ११ वाजून १८ मिनिटांपर्यंत जुळून येणार आहे. तसेच राहू काळ ४ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते ६ वाजेपर्यंत असणार आहे. त्याचप्रमाणे आज संत गाडगे बाबांची जयंती आहे. तर आजचा दिवस तुमच्यासाठी कोणत्या मार्गे सुख घेऊन आला आहे जाणून घेऊया…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२३ फेब्रुवारी पंचांग व राशिभविष्य (Aries To Pisces Horoscope Today) :

मेष:- घरातील वातावरण प्रसन्न असेल. लोक तुमच्या व्यक्तिमत्वाकडे आकर्षित होतील. दिवस मजेत जाईल. तरुण वर्गाला नवीन संधी मिळेल. घरात टापटीप ठेवाल.

वृषभ:- जवळचा प्रवास मजेत पार पडेल. मनातील चुकीचे विचार बाजूला सारावेत. भावंडांचे सहकार्य मिळेल. मोठ्या लोकांच्यात वावराल. आवडत्या कामासाठी वेळ मिळेल.

मिथुन:- आवडीचे पदार्थ खायला मिळतील. कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल. घरातील कामात मन रमेल. मौल्यवान वस्तु खरेदी केल्या जातील. जोडीदाराचे वर्चस्व राहील.

कर्क:- मनमोकळे वागाल. आवडत्या गोष्टींमध्ये वेळ घालवाल. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. स्व‍च्छंदीपणे वागण्यावर भर द्याल. सर्वांशी मिळून-मिसळून वागाल.

सिंह:- मानसिक चंचलता जाणवेल. भावनेच्या भरात वाहून जाऊ नका. नामस्मरण करण्यात वेळ व्यतीत करावा. अंगीभूत कलेचे योग्य कौतुक केले जाईल. जोडीदाराच्या शांत स्वभावाची प्रचिती येईल.

कन्या:- उत्तम व्यावसायिक लाभ संभवतो. मुलांच्या आनंदाने खुश व्हाल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. स्थावरची कामे मार्गी लागतील. आरोग्यात सुधारणा होईल.

तूळ:- प्रतिकूलतेतून मार्ग काढावा. भावंडांचा विरोध होऊ शकतो. काही गोष्टींपासून जाणीवपूर्वक दूर राहावे. प्रलोभनाला बळी पडू नका. भागिदारीतून चांगली कमाई करता येईल.

वृश्चिक:- घशाचे विकार जाणवू शकतात. वस्तूंची उपयुक्तता लक्षात घेऊन खरेदी करावी. काही कामात अधिक श्रम घ्यावे लागतील. कामात उतावीळपणा करून चालणार नाही. गोड बोलण्यावर भर द्यावा.

धनू:- स्वभावात काहीसा हेकटपणा येईल. स्वातंत्रप्रियता दर्शवाल. पारंपरिक कामात लक्ष घालावे लागेल. हातात नवीन अधिकार येतील. भावंडांचा सहवास लाभेल.

मकर:- चिकाटीने कामे कराल. जबाबदारीने वागणे ठेवाल. घराची साफसफाई काढाल. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. कमिशन मधून चांगली कमाई होईल.

कुंभ:- स्थावरच्या कामात यश येईल. हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल. कामात समाधानी राहाल. जवळचे नातेवाईक भेटतील. परिस्थितीशी जुळवून घ्याल.

मीन:- झोपेची तक्रार कमी होईल. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. छंद जोपासायला वेळ काढाल. अपवाद नजरेआड करावेत.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 23 february 2025 aries to pisces rashi bhavishya what way will happiness come to your destiny read horoscope in marathi asp