3rd September Rashi Bhavishya & Marathi Panchang: आज ४ सप्टेंबर २०२४ रोजी भाद्रपद महिन्यातील शुक्ल प्रतिपदा तिथी असणार आहे. प्रतिपदा तिथी पहाटे ९ वाजून ४७ मिनिटांपर्यंत राहील , त्यानंतर द्वितीया तिथी सुरू होईल. तसेच रात्री ८ वाजून ३ मिनिटांपर्यंत साध्य योग राहील. आजच्या दिवशी उत्तर फाल्गुनी नक्षत्र जागृत असणार आहे. तर आज राहू काळ दुपारी १२ ते १ वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार आहे. याशिवाय बुधवारी रात्री ११ वाजून २२ मिनिटांनी बुध सिंह राशीत प्रवेश करेल. तर बुधाच्या राशी परिवर्तनामुळे कोणत्या राशीला लाभ होईल हे आपण जाणून घेऊ या…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

४ सप्टेंबर पंचांग व राशीभविष्य :

मेष:- आपण ठरवलेल्या गोष्टी मार्गी लागतील. अडथळ्यांची शर्यत पार कराल. व्यापारी वर्गाला प्रगतीकारक दिवस. वैवाहिक जीवन आनंददायी असेल. जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल.

वृषभ:- घरामध्ये वेळ खर्च होईल. पण त्यातून समाधान मिळेल. दिवसभर मन प्रसन्न राहील. नवीन कार्याला चांगला दिवस. प्रयत्नात कसूर करू नका.

मिथुन:- बोलण्यात माधुर्य कायम ठेवा. कचेरीची कामे मार्गी लागतील. कठीण कामे सुलभतेने करू शकाल. व्यावहारिक बाबीत सर्व गोष्टी तपासून पहा. एकंदर व्यवहाराचा आढावा घ्यावा.

कर्क:- जुनी उधारी वसूल होईल. मिळकतीत वाढ होईल. हवे असलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. कौटुंबिक वातावरणात रमून जाल. अधिकारी व्यक्तींची भेट होण्याची शक्यता.

सिंह:- घेतलेला निर्णय कायम ठेवा. आत्मविश्वास वाढीस लागेल. कौटुंबिक खर्च जपून करावा. जुन्या मित्रांशी आशादायक संवाद घडेल. प्रेमप्रकरणात पुढाकार घ्याल.

कन्या:- नवीन संधीकडे लक्ष ठेवा. अती श्रमाचा ताण जाणवेल. उत्तम निद्रा सौख्य लाभेल. नातेवाईकांशी दुरावा वाढू शकतो. जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल.

तूळ:- कामाचा जोर कायम ठेवावा. कामाच्या ठिकाणी मान मिळेल. संमिश्र घटनांचा दिवस. अघळ पघळ बोलू नका. स्त्रियांच्या सहवासात रमाल.

वृश्चिक:- द्विधा मन: स्थितीत निर्णय घेऊ नका. कामावरून लक्ष उडू देऊ नका. लोकप्रियतेत वाढ होईल. प्रलोभनाला भुलू नका. मित्रांच्यात वाहवा होईल.

धनू:- व्यावसायिक निर्णय घाईने घेऊ नका. कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल. विरोधक पराभूत होतील. राजकीय सहकार्य लाभू शकेल. रोखीचे व्यवहार सावधानतेने करा.

मकर:- जुनी येणी वसूल होतील. मित्रांच्या भेटीचे योग येतील. अचानक धनलाभाची शक्यता. शेअर्स मध्ये गुंतवणूक करा. इच्छेविरूद्ध प्रवास करावा लागू शकतो.

कुंभ:- मित्रांची योग्य पारख करा. अती तिखट पदार्थ खाऊ नका. जोडीदाराच्या सहवासात आनंद लाभेल. उत्तम कार्यशैली वापराल. क्षुल्लक मतभेदाकडे दुर्लक्ष करा.

मीन:- पित्त विकाराचा त्रास जाणवेल. चारचौघांत तुमची वाहवा होईल. कोणावरही अती विश्वास टाकू नका. जोडीदाराशी मतभेद संभवतात. मानसिक स्वास्थ्य जपावे.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 4th september rashibhavishya budha gochar in sinh rashi positive impact on mesh to mean zodic signs read marathi horoscope asp