Shukra Gochar on 9 October: ज्योतिषात शुक्राला खूप महत्त्व दिलं जातं. तो प्रेम, आकर्षण, सौंदर्य, कला, ऐशोआराम, विवाह, पैसा आणि सर्जनशीलता यांचा कारक मानला जातो. ९ ऑक्टोबर २०२५ रोजी शुक्र कन्या राशीत प्रवेश करणार आहे. याचा परिणाम काही राशींवर चांगला आणि सकारात्मक होईल.
शुक्राच्या या गोचरामुळे काही लोकांच्या प्रेमसंबंधात आणि वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल. जे लोक अविवाहित आहेत, त्यांना नवीन नातेसंबंध जुळण्याची संधी मिळेल. कामकाज आणि व्यवसायातही चांगले परिणाम दिसतील. ज्यांना सौंदर्य, कला आणि सर्जनशील क्षेत्रात रस आहे, त्यांच्यासाठी हा काळ फायदेशीर ठरेल. पैसा व वैभव वाढवण्याच्या संधी मिळतील आणि अडकलेली कामं पूर्ण होऊ शकतात. या काळात निर्णय घेताना संयम आणि समजूतदारपणा ठेवणं महत्त्वाचं आहे. चला तर मग पाहूया, शुक्राच्या या गोचरामुळे कोणत्या राशींना फायदा होणार आहे.
मेष राशी (Aries Horoscope)
तुमच्या प्रेमसंबंधात आणि वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल. जोडीदारासोबत समजूतदारपणा आणि सुसंवाद राहील. पैसा, मालमत्ता आणि वैभव मिळवण्याच्या नवीन संधी मिळतील. जुन्या गुंतवणूक यशस्वी होतील. कला, संगीत किंवा सर्जनशील कामांमध्ये मन लागेल आणि यश मिळण्याची शक्यता वाढेल. घरात आनंद आणि शांतता राहील. कुटुंबासोबतचे नाते अधिक मजबूत होईल.
मिथुन राशी (Gemini Horoscope)
कामात केलेल्या मेहनतीचं फळ मिळेल. ऑफिस किंवा व्यवसायात तुमच्या कौशल्याची दखल घेतली जाईल. आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी हा योग्य काळ आहे. संतुलित दिनचर्येमुळे शारीरिक आणि मानसिक फायदा होईल. घर आणि कुटुंबात शांतता व समतोल राहील. नात्यांमध्ये विश्वास वाढेल आणि जुने वाद मिटतील.
सिंह राशी (Leo Horoscope)
नवीन मित्र आणि नातेसंबंध जुळण्याच्या संधी मिळतील. अभ्यास, करिअर किंवा व्यवसायात मदत व सकारात्मक बदल दिसतील. लहान किंवा मोठ्या प्रवासातून फायदा होईल. सामाजिक जीवनात समतोल राहील आणि नवीन ओळखी होतील.
तूळ राशी (Libra Horoscope)
नोकरी किंवा व्यवसायात मान-सन्मान आणि बढतीची संधी मिळेल. गुंतवणूक किंवा आर्थिक निर्णय फायदेशीर ठरतील. सर्जनशील कामांत यश मिळेल आणि समाजात ओळख वाढेल. नवे प्रोजेक्ट आणि जबाबदाऱ्या सहज पूर्ण होतील.
वृश्चिक राशी (Scorpio Horoscope)
प्रेमसंबंध आणि पार्टनरशिप मजबूत होईल, नात्यात गोडवा वाढेल. घर आणि कुटुंबातील आनंद वाढेल. फॅशन, सौंदर्य किंवा कलासंबंधी कामांत रस आणि फायदा मिळेल. मानसिक समतोल आणि आनंदाचा अनुभव येईल.
धनु राशी (Sagittarius Horoscope)
नवीन संधी मिळतील आणि कामात प्रगती होण्याची शक्यता वाढेल. प्रवास, नवीन प्रोजेक्ट किंवा व्यवसाय योजनेत यश मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा, सन्मान आणि लोकांचा विश्वास वाढेल. ऑफिस आणि व्यवसायात सहकार्यांकडून मदत मिळू शकते.
मीन राशी (Pisces Horoscope)
आर्थिक फायदा मिळेल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. प्रेमात सुधारणा होईल. सर्जनशील काम आणि छंदात यश मिळेल, मानसिक समाधानही मिळेल. घर-परिवार आणि वैयक्तिक जीवनात समतोल आणि शांतता राहील.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)