Shani Dev Margi In Meen 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रात, शनिदेवाला जीवन, वेदना, रोग, दुःख, विज्ञान, तंत्रज्ञान, लोह, खनिज तेल, कर्मचारी, नोकरी, तुरुंगावास इत्यादींचे कारण मानले जाते. तसेच शनी देव वेळोवेळी मार्गी होऊन राजयोग आणि शुभ योग तयार करतात. २०२५ च्या शेवटी शनिदेव शनिदेवाचे मार्गी होणार आहेत, ज्यामुळे धनलक्ष्मी राजयोग निर्माण होईल. अशा परिस्थितीत काही राशींचं नशीब चमकू शकतं. याचबरोबर या राशींमध्ये उत्पन्न वाढण्याचे आणि करिअरमध्ये प्रगती होण्याचे योग तयार होत आहेत. चला जाणून घेऊया, या राशी कोणत्या आहेत…

वृषभ राशी (Taurus Zodiac)

धन राजयोग तयार होणं वृषभ राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतं. कारण शनी देव तुमच्या राशीपासून ११व्या स्थानावर मार्गी होणार आहेत. तसेच शनी देव दशम स्थानाचे स्वामी देखील आहेत. त्यामुळे या काळात तुम्हाला व्यवसाय-कारभारात यश मिळू शकतं. तसेच तुमच्या उत्पन्नातही वाढ होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होऊन तुम्ही चांगला पैसा कमवू शकता. हा काळ कला आणि साहित्याशी संबंधित विद्यार्थ्यांसाठी देखील अनुकूल आहे. तुमच्या करिअरमध्ये प्रगती आणि पगार वाढीची शक्यता आहे. याच कालावधीत आत्मविश्वास आणि नेतृत्वक्षमता वाढेल. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्या तुम्ही यशस्वीपणे पार पाडाल. व्यावसायिकांना नवीन डील्स किंवा भागीदारीतून फायदा होईल.

तूळ राशी (Libra Zodiac)

तुमच्यासाठी धन राजयोग तयार होणं अत्यंत शुभ फळ देणारे ठरू शकते. कारण शनी देव तुमच्या राशीपासून सहाव्या स्थानावर मार्गी होणार आहेत. त्यामुळे या काळात कोर्ट-कचेरीच्या प्रकरणांमध्ये यश मिळेल. तसेच गुप्त शत्रूंवर विजय मिळवाल. नोकरदार लोकांना परदेश प्रवास किंवा विदेशी कंपन्यांशी संबंधित प्रोजेक्ट्स मिळू शकतात. व्यावसायिकांसाठी हा काळ व्यापार विस्तारासाठी शुभ ठरेल. तसेच शनी देव तुमच्या राशीपासून पाचव्या आणि चौथ्या स्थानाचे स्वामी आहेत. त्यामुळे या काळात तुम्हाला भौतिक सुख-समृद्धी मिळू शकते. वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्याचा योग आहे. तसेच संततीसंबंधी शुभ बातमी मिळू शकते.

धनू राशी (Dhanu Zodiac)

तुमच्यासाठी धन राजयोग तयार होणं फायदेशीर ठरू शकते. कारण शनी देव तुमच्या राशीपासून चौथ्या भावात मार्गी होणार आहेत. त्यामुळे या काळात तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होऊ शकते. जुने गुंतवणुकेतून चांगला परतावा मिळू शकतो आणि नवीन प्रकल्पांमध्ये यश मिळेल. नोकरदार लोकांना कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांचे सहकार्य आणि वरिष्ठांची प्रशंसा मिळेल. तसेच शनी देव तुमच्या राशीपासून दुसर्‍या आणि तिसर्‍या स्थानाचे स्वामी आहेत. त्यामुळे या काळात तुमच्या धैर्य आणि पराक्रमात वाढ होईल. तसेच अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.